April 16, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा राजकीय

जलकुंभ परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण

झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येईल का?

खामगाव: तालुक्यातील बोरी येथे जीवन प्रधिकरण विभागाने बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची जागा उभ्या असलेल्या टाकीसह दाखवून एकनाथ ज्ञानदेव टिकार व त्यांचे दोन बंधू यांनी ताब्यात घेत अतिक्रमण केल्यामुळे बोरी येथील सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते सुधीर विश्वासराव टीकार यांनी २१ फेब्रुवारी रोजी बोरी ग्रामपंचयत समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.बोरी गावामध्ये जीवन प्रधिकरण विभागाने १९९२ ते १९९४ दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधून दिली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून २०१० पर्यंत बोरी गावासाठी पाणीपुरवठा करण्यात येत होता. बोरी गावाची २२ गाव पाणीपुरवठा योजनेमध्ये निवड झाल्यामुळे २२ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आरोग्याच्या दृष्टीने पिण्यासाठी पाणी मिळत असल्यामुळे गावातील लोक २२ योजनेचा वापरत करत आहेत. जीवन प्रधिकरण विभागाने बांधलेल्या टाकीतील पाण्याचा वापर कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा व खोदलेली विहिरीवर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आपल्या ताब्यात घेऊन बनलेल्या टाकीची खाली जागा व वस्तू ही माझ्या जागेत आहे. ही जागा माझ्या वडिलांची आहे. असे म्हणून टाकीचे असलेले तारांचे कंपाउंड लोखंडी गेट काढून हे आपल्या घरी घेऊन गेले व टाकीवर पाणी जाण्यासाठी असलेली वाल तोड फोडून करून नासधूस केली. टाकीवरून रिटर्न येत असलेल्या पाण्याच्या स्रोतांमध्ये गोटे व माती टाकून बुजवून टाकला आहे. ज्या लोकांनी टाकीच्या परिसराचा ताबा घेतला आहे.या लोकांनी जागेवर बगायती शेती सुद्धा केली आहे. यामुळे शासकीय वस्तूचा ऱ्यास होत आहे. गावात पाणी सुरू असले तरी तांत्रिक अडचणीमुळे एक-एक दोन-दोन महिने गावांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. जीवन प्रधिकरण पाणीपुरवठा योजनेचा उपयोग केल्यास गावातील पाणीटंचाई दूर होऊ शकते गावांमध्ये अचानक उद्भवलेल्या पाणीटंचईला योजनेचा लाभ होऊ शकतो त्यामुळे संबंधितांनी परिसराला केलेली तारांचे कंपाउंड काढून टाकने अत्यंत महत्त्वाचे आहे. करिता ही जागा तत्काळ मोकळी करण्यात यावी या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

११ महिण्या अगोदर केल्या आहेत तक्रारी व कितेक वेळा स्मरणपत्र देऊनही कारवाई करण्यात आली नाही पाहिली तक्रार १५/३/२०२१रोजी देण्यात आली आहे.तर स्मरणपत्र ११/१/२०२२रोजी दिले आहे

संबंधित प्रशासनाकडून तक्रारीला केराची टोपली दाखवल्या मुळे उपोषण करण्याची वेळ तक्रार दारावर प्रशासनाने आणली आहे. कायदा-सुव्यवस्था उद्भवल्यास सर्व जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील व त्याला जबाबदार अधिकारी असतील

Related posts

सुटाळा बु येथे राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण

nirbhid swarajya

श्री राम मंदीराचा पायाभरणी समारंभ दिवाळी सणाप्रमाणे साजरा करावा – आ.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

अवैध अग्निशस्त्र विक्री करणारा अटकेत ; 5 पिस्टल जप्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!