खामगाव:तालु्यातील बोरी अडगाव येथील संजय काटकर या शेतकऱ्याच्या शेतातील हरभऱ्याच्या सुडीला आग लावल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली. बोरी शिवारात स्व. सुधाकर बळीराम काटकर यांचे नावावर गट नं. ३५ मध्ये १हेक्टर ८८ आर शेती आहे सदर शेती मध्ये ३ भावांचे हिस्से आहेत. या गट नंबर मधील संजय काटकर यांच्या हिस्स्याला आलेली शेती १.५ एक्कर यामध्ये हरभरा पिक पेरलेला होते सदर हरभरा पिकाच्या सुडी लावलेली होती. सदर सूडीमध्ये अंदाजे १६ क्विटल हरभरा ज्याची किंमत अंदाजे ६५,०००/- रुपये आहे. हरभ-याची सूडी लावुन ते संद्याकाळी घरी परत आले व त्यानंतर पुन्हा रात्री शेतात जावुन हरब-याचे सूडीला ताडपत्रीने झाकुन घरी परत येउन जेवन करण्यास रात्री ९ वा सुमारास बसले असता मला शेजारी अशिष विनोंद टिकार यांनी मोबाईल फोनव्दारे कळविले की तुमच्या शेतात असलेल्या हरभ-याचे सूडीला आग लागली आहे .असे कळविल्यावर शेतात गेलो असता शेतातील हरभ-याचे सूडीला आग लागलेली व गावातील लोकांनी आशिष टिकार यांच्या शेतात असलेल्या विहीरीचा पंप चालु करुन सदरची आग विझवली परंतु आग जास्त प्रमाणात असल्याने १६ क्विटल हरभरा जळुन खाक झाला त्यामुळे अंदाजे ६५०००/- रु नुकसान झाले तसेच शेतात ज्या ठिकाणी हरभ-याची सूडी ठेवली होती त्याचे जवळपास इलेक्ट्रीक पोल नसुन व ईलेक्ट्रीक सप्लाय तार गेलेली नाही त्यामुहे सदर ठिकाणी शार्ट सर्कीट होवुन आग लागण्याचा प्रश्न निर्मान होत नाही .तसेच आग लागण्या पुर्वी शेतात गेलो असतांना शेकोटी वैगरे पेटवली नव्हती कोणीतरी अज्ञात इसमाने शेतातील हरभ-याचे गंजीला आग लाउन माझे अंदाजे ६५०००/- रु नुकसान केले आहे . या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये भा द वी ४३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे