April 19, 2025
ब्लॉग मुंबई विविध लेख सामाजिक

एक अनोखे क्षेत्र – हीलिंग

गायत्री सरला दिनेश घुगे. (ताडदेव)

मुंबई :-डॉक्टर अवनी राज्याध्यक्ष यांना आधुनिक काळातील अध्यात्मिक विचार करणाऱ्या म्हणजे स्पिरिच्युअल हिलर म्हणून ओळखले जाते. आणि त्या एक शिक्षिका देखील आहेत. तसेच 18 डिसेंबर 2010 रोजी त्यांनी इन्फनाईट हीलींग हे हीलींग सेंटर सुरू केले. हे एक इन्स्टिट्यूट आणि सेंटर आहे. इन्फनाईट हीलींग ही पहिली ISO प्रमाणित हीलिंग संस्था आहे. ज्यामध्ये एकाच छताखाली विविध प्रकारचे उपचार पद्धती शिकवल्या जातात. तसेच डॉ अवनी ह्या पर्यायी उपचार पद्धती म्हणजेच अल्टरनेटिव मेडिसिन मध्ये MD आहेत आणि त्यांनी PHD देखील मिळवली आहे. त्या वैज्ञानिक हस्ताक्षर शास्त्रज्ञ देखील आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या करियर मध्ये त्यांनी 42 प्रकारच्या हीलिंगच्या पद्धती शिकून विशेष प्राविण्य मिळवले आहे. तसेच अनेक पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ अवनी यांनी या क्षेत्राकडे एक व्यवसाय म्हणून न पाहता एक वेगळे अनोखे बिझनेस मॉडेल तयार केलेले आहे. जेणेकरून लोकांना त्याची प्रचीती येईल की, हीलींग हे क्षेत्र देखील एक यशस्वी करिअर ठरू शकते. डॉ. अवनी यांच्या वर्कशॉपला आता आंतरराष्ट्रीय मागणी देखील मिळत आहे. हीलिंग मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी दोन उपकरणे तयार केली आहेत. डॉ अवनी या स्पिरिच्युअल हिलर तर आहेतच पण त्याच सोबत त्या शिक्षिका, उद्योजिका, प्रशिक्षित नृत्यांगणा, अभिनेत्री देखील आहेत आणि एक उत्तम व्हॉईस ओवर आर्टीस्ट देखील आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून डॉक्टर अवनी राज्याध्यक्ष यांच्याकडून आपण हीलिंग या क्षेत्राबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.


प्रश्न :- हिलिंग हे नक्की काय आहे ? सोप्या भाषेत आमच्या प्रेक्षकांना या बद्दल सांगा ?
डॉ. अवनी राज्याध्यक्ष :- हिलींगला कोणत्याही प्रकारचा मराठी अनुवाद हा नाही. परंतु जर सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हीलिंग म्हणजे बरे होणे. जर आपल्याला लागले तर त्या मधून आपण जेव्हा बरे होतो, तेव्हा आपण हिल होतो. फक्त हीलिंग हे क्षेत्र शारीरिक हिलिंग पुरते मर्यादित नाही. मी अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये डॉक्टर झाली आहे. जेव्हा आपण इमोशनली, मेंटली, फायनान्शिअली, बाबतीत, रेलेशनशीपमध्ये, स्वतःबरोबर फिजिकली सेटल होतो… म्हणजेच सर्व गोष्टींमध्ये जेव्हा हिलींग होते तेव्हा एखाद्या माणसाचे हिलिंग झाले. म्हणजेच सर्व गोष्टींमध्ये बरे होणे म्हणजे हीलींग.

प्रश्न :- तुमची स्वतःची या क्षेत्रांमध्ये गोडी कशी निर्माण झाली ?
डॉ. अवनी राज्याध्यक्ष :- मी माझी सुरवात हि अभिनय क्षेत्रांतून केली. एकांकिका… वैगेरे अशी माझी पहिली सुरुवात झाली. तेव्हा आमच्या इथे या क्षेत्रांशी कोणीही संबंधित नव्हतं. तर माझी आई खूप टेन्शन घ्यायची. मग ती कोण्या जोतिषाकडे जा, कुठे पत्रिका दाखव, पोथ्या वाचन वैगेरे अश्या गोष्टी तेव्हा तिने सुरु केल्या. आणि मग मी तिच्या सोबत जायची. मग ते जे काही सांगायचे ते सर्व वेगळा भाग आहे. पण त्याची ती मांडणी, त्यांची सांगण्याची पद्धत यात सर्व कुतूहल वाटायला लागले. तेव्हा मग असं वाटले कि हे शिकायला हवे. मग मी त्यातीलच एका गुरुजींना पकडलं आणि त्यांना विचारलं तुम्ही मला हे शिकवाल का ? मग समजल यात गणित आहे. पण माझं गणित खूप वाईट होत. मग ते गुरुजी मला म्हणाले तू टॅरो रिडींग कर. म्हणजे एक पत्ता तुला बरच काही सांगतो. मग मी टॅरो रिडींग ने शिकायला सुरवात केली. मग त्यात आवड निर्माण झाली. मग मला समजलं यात सोल्युशन्स काहीच नाहीय. यात हे होऊ शकत किंवा हे नाही होऊ शकत. अश्या गोष्टी समजतात. मग सामान्यतः मेडिटेशन सुरु केले. मग एक – एक गोष्ट शिकत मला त्यात गती वाटायला लागली. आणि आयुष्य म्हणून पण एक वेगळ्या दृष्टिकोनातून मी स्वतः कडे बघायला लागली.

प्रश्न :- तुमचे स्वतःचे इन्फनाईट हीलींग सेंटर आहे तर तुमच्या या संस्थे बद्दल माहिती सांगा ?
डॉ. अवनी राज्याध्यक्ष :- मी अभिनय केला. नाटकात सिरीयल मध्ये काम केले. आणि मग लग्न झाले. आणि मग मी ठरवले माझ्या कुटुंबाला वेळ द्यायला. मग मी एक वर्ष काहीच केलं नाही. मग माझ्या नवर्यानी मला विचारलं तू आता घरात खूप बसली आता. तू आता तुझ्या कामाचं बघ काही तरी. मग तो बोला अभिनय क्षेत्राचं बघ आता पण तेव्हा मी बोली कि मला हे नाही करायचे. मुलाला बघून वेळा पालन हे सर्व काही मला होणार नाही. मग तो बोला तू घरात तर आता बसायचं नाहीय. तुला टॅरो रिडींग येत मग तू हे का नाही करत ? मग मी ठरवलं हे मला जमू शकत. घर, मूळ सांभाळून मला काय करता येईल? मग हे क्षेत्रात मी पूर्ण पणे वळली. घर मूळ सांभाळून दिवसातून दोन अँपॉईनमेंट घेतल्या कि झालं. मग लोकांना ते आवडायला लागलं. आणखी लोक यायला लागले. मग माझं काम वाढायला लागलं. मग मी एक मुलगी ठेवली कमला, एक गाला घेतला, नंतर दुसरा गाला घेतला … असं करत करत मी स्वतःची जागा तयार केली. म्हणजे इन्फनाईट हीलींग ची निर्मिती झाली. 18 डिसेंबर 2010 रोजी त्यांनी इन्फनाईट हीलींग हे हीलींग सेंटर सुरू केले. यामागील उद्देश हा आहे कि सर्व काही एकत्र मिळायला पाहिजे. एकाच छताखाली विविध प्रकारचे उपचार पद्धती असाव्यात. समुपदेशन, टॅरो रिडींग, ज्योतिषशास्त्र,अंकशास्त्र… या सर्व गोष्टी एकाच छताखाली मिळाव्या. हि संकल्पना माझ्या डोक्यात होती. आणि मी आधी शिकले होते. मग मी ठरवले यात लायसन्स घेऊन यात काही तरी करायला हवे आहे. मग लग्न नंतर अल्टरनेटिव्ह मेडिसिन साठी प्रवेश घेतला. आणि मग मला पी.येच.डी मिळाली. इन्फनाईट हीलींग म्हणजे एकाच छताखाली विविध प्रकारचे उपचार पद्धती.

प्रश्न :- हीलिंग मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी दोन उपकरणे तयार केली आहेत ही नक्की काय उपकरणे आहेत ते सांगा ?
डॉ. अवनी राज्याध्यक्ष :- मी जेव्हा अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये MD केले तेव्हा, त्याचं दरम्यान मी माझा एक रिसर्च चालू ठेवला. सामान्यतः मी सर्वच बाबतीत काहीना काहीतरी रिसर्च हा करतच असते. तर मला तेव्हा असा विचार आला की इलेक्ट्रो मग्नेटिक फिल्ड या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करावे. म्हणजे आपल्या आसपासचे जे वलय असते त्याला इलेक्ट्रो मग्नेटिक फिल्ड असे म्हणतात. त्या फिल्डमुळे दुसऱ्यांची ऊर्जा, आजूबाजूची ऊर्जा सर्व घेत असतो. मग त्याची देवाण घेवाण होऊन आपल्याला अनेक प्रॉब्लेम होत असतात. काही व्याधी, पैसे, रिलेशनशिप, बाहेरची बाधा… वैगेरे असे सर्व प्रॉब्लेम येतात. मग ते सर्व कसं सोडवायचे ? मग मी असा विचार केला की आपण एक यंत्र (Device) बनवून बघुया. तर मग मी एक यंत्र बनवले त्याच नाव मी – Ora Clenjer I H आहे. तर त्यामध्ये लाईट थेरेपी, साऊंड थेरेपी, आणि सायकिक थेरेपी आहे. सायकिक म्हणजे आपले ऊर्जा वर्क. या ३ गोष्टीचा समावेश हा त्या यंत्रा मध्ये केला आहे. हे यंत्र बनवल्या नंतर साधारण ५ वर्षे मी त्याच्यावर काम करत होते. म्हणजेच त्या यंत्राला साधारण किती वेळ लागतो, ते यंत्र नीट चालते की नाही… आणि नाही झालं नीट तर काय… अश्या सर्व गोष्टीवर गेल्या ५ वर्षापासून पासून मी रिसर्च करत आहे. आता ते यंत्र बाजारात आणण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहे.
दुसरे यंत्र आहे – Chakra Balancer I H . सर्वांना माहीत आहे की आपली जी ऊर्जा स्थाने आहेत त्यांना चक्र अस म्हणतात. ते दिसत नाहीत पण ते सायकिक ऑर्गन आहेत. तर ती ऊर्जा स्थाने ज्यामधून आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि एनर्जी बाहेर जात असते जसे आपले रेग्युलेटर कसे असतात तसे हे चक्रा असतात. तर बाहेरची म्हणजेच कॉस्मिक ऊर्जा आधी ते शोषून घेतात आणि नंतर मग ते वितरीत करतात. तर त्यात काही बिघाड झाला किंवा ते पूर्णतः चालतच नाहीय, किंवा नकारात्मक चालले, किंवा १०-२० टक्के च चालले तर मग तेवढच आपल्याला मिळते. मग हे सर्व कसे सरळ करायचे. जेव्हा सर्व ऊर्जा स्थाने ठीक असतील तेव्हा सर्व अलायमेंट असेल आणि तेव्हा आपल्याला सर्व ऊर्जा मिळून एक ऑप्टिमम आयुष्य जगू शकतो. या यंत्रा मध्येही लाईट थेरेपी, साऊंड थेरेपी आणि सायकिक थेरेपी आहे. ते सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि त्या नंतर त्या बदल्यात सर्व प्रेस्क्रीप्शन आम्ही देऊ ते मिळतात.
तर ही दोन यंत्र मी बनवली आहेत. सुरुवातीला मी सुताराकडून ते लाकडाचं बनवून घेतल होत. पण आता मी परफेक्ट आणि कॉम्पॅक्ट असे यंत्र बनवायला घेतले. ज्यामध्ये दोन्ही यंत्रे हे एकत्र चालतील. तर या वर मी अजून रिसर्च करत आहे पण ते झालं की लवकरच बाजारात ते येईल.

प्रश्न :- मला या क्षेत्राबद्दल कोणतेही नॉलेज नाही. एखादी तिसरी व्यक्ती म्हणून मी या क्षेत्राकडे बघत आहे त्यामुळे हे मला थोडे जास्त कठीण वाटते पण मला हे शिकायचं आहे आणि हे शिकण्यासाठी काही सोपी पद्धत आहे का ?
डॉ. अवनी राज्याध्यक्ष :- सर्वांना या क्षेत्राबद्दल कुतूहल हे असते. आपण भारत या देशात राहतो. तर आताच्या पर्यंतच्या आयुष्यात प्रतेकाला या क्षेत्राचा अनुभव हा आलेला असतोच.मग तो वाईट किंवा चांगला पण अनुभव नक्कीच आला असेल. जर एखादे नास्तिक माणूस असेल तर हे असे का? अंधश्रद्धा च का? अश्या स्टेजला का होईना पण कुतूहल असतेच. या क्षेत्राकडे बघताच सर्व अस मॅजिक म्हणून बघतात. म्हणजे एका कार्ड वरून किंवा फेस वरून चेहऱ्यावर वरून तुला कसं समजल … या क्षेत्राबाबत सर्वांना कुतूहल हे नक्कीच आहे. मग सर्वांना अस वाटत आपल्याकडे पण अस मजिक असावे आपणही काहीतरी शिकावे आणि मग स्वतःला मदत करावी आणि इतर लोकांना देखील मदत करावी हेच सध्या पुरेसे आहे. जर शिकायचे असेल तर आपल्याकडे बहुतांश गोष्टी या इंग्लिश आहेत. आणि उरलेल्या आपल्याकडच्या गोष्टींना संस्कृत आहेत. म्हणजे सर्व मंत्र वाचा … त्याच डिकोडिंग करा ते बरोबर झाले तर थिंक नाही तर अनेक अर्थाचे अनर्थ किंवा कोणत्याही फळाची अपेक्षा करायची नाही असे काही होत नाही. तर यात मी एक मार्ग काढला तो म्हणजे सोप्या गोष्टी सोप्या भाषेत शिकवायच्या. मला साधारण चार भाषा येतात. इंग्लिश, मराठी, हिंदी, आणि गुजराती. मी या चारही भाषांमध्ये शिकवू शकते. भाषा इकडे प्रॉब्लेम देत नाही. आणि मी शिकवताना आज खूप सोप्या भाषेत शिकवते. उत्तुंग, क्षमाशीलता वगैरे असे शब्दच मी वापरत नाही.जे सामान्य माणसाला जमतील असे सर्व शब्द मी वापरते. उदाहरणे देताना देखील मी समोरच्याला समजेल अशी उदाहरणे देऊनच मी ते सर्व शिकवते. या मध्ये मी सुरवातीचे चे कोर्सेस काढले आहेत. जे फक्त 999 रुपयांचे आहेत. जर एखाद्याला टॅरो रिडींग शिकायचे आहे पण जमेल कि नाही हि शंका आहे. तर या मध्ये 999 मध्ये 2 तासांचा कोर्से आहे. बेसिक टॅरो – तर बेसिक टॅरो शिकल्यावर तुम्हाला कळेल याच्यात गती आहे की नाही, हे आपल्याला आवडत आहे की नाही, जमत आहे की नाही, आणि जर हे जमले तर ॲडव्हान्स टॅरो शिका. यासारखे फेस रेडींग, वैगेरे कोर्सेस आहेत. हातातील लोलक पकडून शिकवले जाते. अँजेल थेरपी आहे. असे अनेक हे सुरुवातीचे कोर्से आहेत. जे फक्त 999 रुपयांना उपलब्ध आहेत. आणि यातले नाही तर ठीक आहे. 999 रूपये गेलेतरी काही हरकत नाही. अशा अनेक सोप्या पद्धतीने मी हे सर्व शिकवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आम्ही जेव्हा हे शिकवतो तेव्हा आमच्याकडे कोणतीही गुरुपरंपरा नांदवत नाही. कोणीही मला फॉलो करावे गुरुपौर्णिमेला नमस्कार करावा असे कोणतेही प्रकार आमच्याकडे चालत नाहीत किंबहुना मला आवडत नाही. या सर्व गोष्टी मला पटतात परंतु … हीलिंग मध्ये या गोष्टी चालत नाहीत. माझे असे मत आहे की आता माझ्याकडे जे काही ज्ञान आहे ते मी इतरांना प्रोव्हाइड करणार ज्ञान दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार तुम्ही घ्या आणि त्यात तुमचे स्वतःचे ज्ञान ॲड करून इतरांना प्रोव्हाइड करा. त्यामुळे हे सर्व खूप सोप्या पद्धतीने आपण शिकू शकतो.

प्रश्न :- या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी नक्की कोणत्या संधी उपलब्ध आहेत ?
डॉ. अवनी राज्याध्यक्ष :- हीलिंग ही कोणत्याही प्रकारची टेक्निक नसून ती एक लाईफस्टाईल आहे. म्हणजेच स्पिरिच्युअल अवेअरनेस एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लाइफस्टाइल मधूनच आला पाहिजे. उदाहरणार्थ एखादी मांजर केली तर, अपशकून होणार का हे असे बहुतांशी मानले जाते तर यालाही लिंग मध्ये पॉझिटिव्ह पद्धतीने कसे बघितले जाते हे बघतो. कोणत्याही क्षेत्रात एम्प्लॉयमेंट आपण जनरेट करू शकतो. समुपदेशन क्षेत्रामध्ये याचा पूर्णतः उपयोग होतो. दुसरे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात देखील याचा उपयोग होतो. म्हणजेच लहान मुलांना आपण पॉझिटिव्ह एटीट्यूड शिकवला पाहिजे. म्हणजे म्हणजे लहानपणापासूनच काय शिकवायचं यासाठी शैक्षणिक सेक्टरमध्ये सुद्धा या गोष्टीला स्कोप आहे. मुलांचे रिपोर्ट काढणे, मुलांचे सायकॉलॉजिकल दृष्ट्या बघणे सध्या प्रत्येक शाळेत एक सायकॉलॉजिस्ट देखील असते तिकडे सुद्धा तुम्हाला करिअर स्कोप आहे. रिपोर्ट मेकिंग मध्ये करिअर स्कोप आहे. चायना या देशात एक डी आय एम रिपोर्ट आहे तो केल्या शिवाय तर ऑलिंपिकमध्ये सुद्धा तुमहाला भाग घेता येत नाही. आणि तो रिपोर्ट एकदम बरोबर असतो. आणि चायना ऑलिंपिकमध्ये जिंकते. किड्स सेकशन पॅरेंटिंग सेकशन मध्ये अश्या खूप सेक्टर मध्ये हे करिअर उपलब्ध आहेत. तसेच हे शिकलात तर तुम्ही स्वतःही या बाबतीत स्वतःच करियर घडवु शकतात. कॉर्पोरेट सेक्टर मध्ये अनेक ताणतणाव असतात. म्हणजे त्या व्यक्तीतील स्किल्स, प्लेसमेंट्स या सारख्या गोष्टी ते लोक स्वतः बघत असतात. तेव्हा त्यांना आपल्या सारख्या लोकांची हि गरज असतेच. दुसरं येत एम्प्लॉयमेंट सेक्टर म्हणजे जिथे भरती आहे, एच आर आहे तिकडे देखील खूप चॅन करिअर स्कोप आहे. कारण स्वाक्षरी विश्लेषण, रिपोर्ट्स, फासे रिडींग यावरून एखाद्या हिलर ला समजत कि हा माणूस कसा आहे. मग आपण त्या कंपनी ला सांगू शकतो कि या कुठे योग्य आहे. अश्या प्रकारे फक्त सही, फासे रिडींग करून सुद्धा हे सर्व आपण करू शकतो. तसेच यात अंकी एक गंमत आहे ती आपल्या भारतात फार प्रचिलित नाही आहे पण परदेशात इन्वेस्टीगेशन सेक्टर मध्ये सुद्धा खूप करिअर स्कोप आहे. म्हणजे कुठे गुन्हा झाला तर आमच्या सारख्या लोकांना तिथे बोलवले जाते आणि तिकडे सर्व समजत काय झालं काय नाही झालं ते. अश्या गोष्टी परदेशात होत असतात.

प्रश्न :- या क्षेत्रामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत ?
डॉ. अवनी राज्याध्यक्ष :- ऍडव्हान्स कोर्सेसमध्ये रेकी लेवल, एंजल लेवल, टॅरो रिडींग, ग्रुमिंग, चक्रा, ऑरा, बॅच फ्लॉवर, नुमरॉलॉजि ऍडव्हान्स, वास्तु ट्रेडिशनल ऍडव्हान्स, वास्तु स्पिरिच्युअल ऍडव्हान्स, क्रिस्टल लेवल या सारखे ऍडव्हान्स कोर्सेस आहेत. तर करन्सी नोट विश्लेषण, ऑटोमॅटिक लिखाण, लोगो डिझाइनिंग, ग्रुमिंग, गर्भ संस्कार या सारखे अन्य कोर्सेस देखील आहेत. डिप्लोमा इन कंसेप्ट्स , डिप्लोमा ऑफ ग्रुमिंग , डिप्लोमा इन मोडलीटीएस , डिप्लोमा इन स्पिरिच्युअल मार्केटिंग , डिप्लोमा इन स्पिरिच्युअल थेऊरमस हे पाच मास्टर्स डिप्लोमा इन हीलिंग कोर्सेस आहेत. जे आमच्याकडे उपलब्ध आहे.

प्रश्न :- एक महिला म्हणून तुम्ही इतर महिलांना काय मार्गदर्शन कराल ?
डॉ. अवनी राज्याध्यक्ष :- माझा एक च संदेश आहे जर मी हे करू शकते तर तुम्ही हि हे करू शकता. महिला कडे अंधरूनी स्पिरिच्युअलिटी म्हणजेच सिक्स सेन्स हे असतात. सर्व महिलांना बाजूचीच काय चालू, नवऱ्याचं, मुलांचं काय चालू आहे ते बरोबर माहित असत. सिक्स सेन्स हा असतो आणि त्याचा व्यवथित वापर करणे महत्वाचा आहे. त्यामुळे महिलांनी नक्कीच या क्षेत्रत यावे आणि त्याचे क्षात्र शुद्ध शिक्षण घ्यावे. आणि त्यांनी स्वतःचे घर, आयुष्य, मूल आसपासचा परिसर नीट करावा … हि जबाबदारी आरामात पेलू शकतात असं मला नकी वाटतं.

मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे ती म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी. मराठी प्रेक्षका हा सजाण आहे. आपल्याकडे साहित्य खूप आहे. अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. तर या क्षेत्रात मराठी लोकांनी तेवढा बघ घेतला नाही आहे. तर स्पिरिच्युअलिटी एका वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही बघायला लागा. हे सर्व शिक्षण मराठी मधून सुद्धा आमच्या कडे आहे. तर मी आवाहन करते सर्व मराठी प्रेक्षकांना कि तुम्ही या क्षेत्राकडे नक्की वळा.

अधिक माहितसाठी संपर्क साधा
मुलाखत – अध्यात्मिक हिलर डॉ. अवनी राजाध्यक्ष – 7045349282

Related posts

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामातून कोट्यावधी रुपयांचे धान्य गायब

nirbhid swarajya

अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा….

nirbhid swarajya

खामगांव मधे वाढत आहे मृत्युचे प्रमाण; आज ९ जणांचा मृत्यु

nirbhid swarajya
error: Content is protected !!