November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

प्रेम प्रकरणातून युवकावर प्राणघातक हल्ला

शिवाजी नगर पोलिस स्टेशन समोर झाला हल्ला

खामगाव: येथील सती विभागातील रहिवाशी राहणाऱ्या एका युवकाने परिसरात राहणाऱ्या एका युती सोबत काही दिवस अगोदर प्रेम विवाह केला होता. याबाबत आज ते जबाब नोंदवण्यासाठी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला हजर राहून माहिती देण्याकरता दाखल झाले होते. त्यावेळी याची माहिती काही मंडळींना मिळाली असता त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन बाहेर येऊन युवकाशी वाद घातला व ऑटो मध्ये बसलेला रघु विजय तिवारी वय २६ ह्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे खामगाव शहरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

ही घटना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोर घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. पहिली या युवकाला प्रथम उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरता शहरातील सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी युवकाकडील मंडळी तक्रार देण्याकरता शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली. यावेळी सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Related posts

माँ जिजाऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाडी तर्फे शिक्षक दिनी वाडी परिसरातील सर्व शिक्षकांचा केला सन्मान …

nirbhid swarajya

आषाढी एकादशी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

nirbhid swarajya

ऑपरेशन मुस्कान दरम्यान शहर पोलीसांनी हरविलेल्या बालकास दिले ताब्यात

nirbhid swarajya
error: Content is protected !!