खामगाव :भारताचे गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त आज जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार येथे श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी संस्थेच्या सचिवा प्रा.सौ सुरेखा ताई गुंजकर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी त्यांनी श्रीनिवास रामानुजन यांचे गणित विषया मध्ये असलेले कार्य याबद्दल विद्यार्थ्याना माहिती दिली तसेच यावेळी गणित विषयावर स्पर्धा घेण्यात आली, यावेळी विद्यार्थ्यानी उस्फुर्त सहभाग घेतला.या स्पर्धेचे परीक्षक गणित विषयाचे श्री हिवराळे सर व ब्राम्हणे सर ,मुख्याध्यापिका सौ बनकर मॅडम , उपमुख्याध्यापक श्री अल्हाट सर यांच्या समवेत सर्व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.