खामगांव:- खामगाव तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक किशोरआप्पा बाबासाहेब भोसले यांची निवड करण्यात आली आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना समिती अंतर्गत कामकाजाची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यक्ष आणि अशासकीय सदस्यांच्या समितीच्या नावाचा प्रस्ताव बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दि.02 डिसेंबर 2021 रोजी मा.जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्या प्रस्तावास मा.जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दि.13 डिसेंबर 2021 रोजी मंजुरी दिली आहे. त्या अनुशंगाने खामगाव तालुका अध्यक्षपदी नगरसेवक किशोरआप्पा भोसले तर अशासकीय सदस्य म्हणून शेख सलीम शेख फरीद (रा. खामगाव ) संतोष बोचरे ( मु. पो. मांडका) प्रीतम माळवंदे (रा. खामगाव), सौ. शारदाताई विजय शर्मा ( रा. खामगाव) प्रकाश सिताराम कोंडे ( रा.जनुना ) जयराम विष्णू मुंडाले (रा. पेडका पातोंडा) अब्दुल अलीम अब्दुल करीम ( रा. पिंपळगाव राजा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी आपल्या निवडीचे श्रेय जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे व माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना दिले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्षपदी नगरसेवक किशोर भोसले यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना नगरसेवक किशोर आप्पा भोसले म्हणाले की संजय गांधी निराधार अनुदान योजना पासून लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणार आहे. खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,प्रशासकीय अधिकारी यांना विश्वासात घेऊन सर्वसामान्य गरजू पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहील अषी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
previous post
next post