April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी विदर्भ

नकली नोटा घेऊन जाणारी टोळी अपर पोलीस अधिक्षक पथकाने पकडली

नकली नोटा पकडल्या: कारसह दोघे पोलीसांच्या ताब्यात, सिने स्टाईल पाठलागकरून पकडले

खामगाव: गुप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधिक्षक पथकाने सापळा रचून नकली नोटा बाळणाऱ्या दोघांच्या टोळीस बुधवारी सायंकाळी पकडले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून काही रक्कमेच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्यात. अतिशय सिनेस्टाईल पध्दतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी माहिती देण्यास पोलीसांकडून कमालिची गोपनियता बाळगण्यात येत आहे.राष्ट्रीय महामार्गावरून एमएच ३०- एएफ ४२९५ क्रमांकाच्या प्रवासी कारमधून दोघेजण नकली नोटा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधिक्षक पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधिक्षक पथकाने सापळा रचला. अकोला मार्गे कार खामगावकडे येत असल्याची खात्री पटताच पथकाने टेंभूर्णा फाट्यापासून नकली नोटा असलेल्या कारचा पाठलाग सुरू केला. दरम्यान कार चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने पळवित बाळापूर नाका मार्गे सुदर्शन चौकात एका रस्त्यात मध्येच उतरवून दिले. त्यानंतर कार घेऊन बाळापूर फैल, रेखा प्लॉट, बर्डे प्लॉट मार्गे भरधाव वेगाने कार चिखली बायपासकडे पळविण्याचा प्रयत्न केला.  

सतीफैलातून बर्डे प्लॉट मार्गे सजनपुरीकडे जाताना या कारने पत्रकार विक्रम अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी कविता अग्रवाल यांना उडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कारचा पाठलाग करीत असलेल्या पथकाने शीरसगाव देशमुख परिसरात कारचालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नकली नोटा जप्त करण्यात आल्या. तर बाळापूर फैलातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुसऱ्या एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी ताब्यात घेतले वाहन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले आहे. तर यातील एका आरोपींना ग्रामीण तर दुसऱ्या आरोपीस शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोस्टेला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. याबाबत अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना घटनेबाबत विचारणा केली असता कारवाई सुरू आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल असे त्यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना सांगितले

Related posts

वंचित कडून सतीश पवार विरुद्ध पोलिसात तक्रार…

nirbhid swarajya

अनोळखी इसमाचा आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

nirbhid swarajya

गोडाऊन मधून 20 क्विंटल मूग लंपास

nirbhid swarajya
error: Content is protected !!