November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शेगांव

अग्रसेन चौकात अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एक संशयित आरोपी ताब्यात

शेगांव : २८ नोव्हेंबर रोजी रात्री २:३० वाजताच्या सुमारास शेगाव शहरातील अग्रसेन चौक परिसरातील दार्जिलिंग चहाच्या हॉटेलसमोरील पादचारी मार्गावर अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक गौतम इंगळे, पोलीस उपनिरीक्षक कमलेश खंडारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे,पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र नारखेडे आणि अमोल परिहार यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला एका तासातच अटक केली आहे. मृतक झालेला इसम मानसिक स्थिती ढासळलेला आणि भीक मागून उदरनिर्वाह करणारा होता अशी माहिती परिसरातील नागरिकांकडून पोलिसांना देण्यात आलेली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस पंचनामा करीत असून मृतक इसमाला सईबाई मोटे रुग्णालय येथील सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र या ठिकाणी नेण्यात आले आहे. त्या घटनेचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू असून लवकरच या घटनेचा उलगडा होणार आहे.

Related posts

वरली मटक्यावर LCB पथकाचा छापा; ५ जण ताब्यात १ फरार

nirbhid swarajya

नगरसेवक दुडे यांची अशीही कृतज्ञता

nirbhid swarajya

मंडळ अधिकारी विजय कुलकर्णी यांचे कोरोनामुळे निधन

nirbhid swarajya
error: Content is protected !!