January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

चिखलीतील आनंद इलेक्ट्रॉनिकवर सशस्त्र दरोडा ; दुकान मालक कमलेश पोपट यांची हत्या

चिखली : चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानात दि.१६ नोव्हेंबरच्या रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला दोन दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात दुकानाचे मालक कमलेश पोपट हत्या झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण चिखली शहरात जोरदार खळबळ उडाली आहे व चिखली शहराच्या व्यापारी वर्गासह नागरिकामध्ये या घटनेने मोठी घबराट निर्माण झाली आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, आनंद इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे मालक यांनी रात्री ९:४५ वाजता त्यांच्या दुकानाचे मेन शटर बंद केले व बाजुचे छोटे शटर उघडे ठेवले यावेळी एका दुचाकीवरून तीन दरोडेखोर दुकानासमोर आले. त्यामधील दोन दरोडेखोर दुकानात सशस्त्र घुसले. एका दरोडेखोरांजवळ बंदुक होती. ती बंदुक त्या दरोडेखोरांने दुकानाचे मालक कमलेश पोपट यांच्यावर रोखली. यावेळी कमलेश पोपट व दरोडेखोरा यांच्यामध्ये बरीच झटापट झाली. कमलेश पोपट घाबरून शटरकडे पळत असताना दरोडेखोरांनी त्यांना पकडले एका दरोडेखोराने कमलेश पोपट यांचा गळा आवळून त्यांना रोखुन धरले तर दुसऱ्या दरोडेखोरांने त्यांच्यावर सपासप तलवारीने अनेकवेळा वार केले तलवार त्यांच्या पोटात देखील खुपसली. तलवारीने केलेल्या या हल्यात ते जबर जखमी होऊन खाली कोसळले. त्यानंतरही जाताना दरोडेखोरांनी तलवारीने पुन्हा त्यांच्या तोंडावर सपासप वार केले. त्यामुळे ते आणखी गंभीर झाले. त्यानंतर ते दोन्ही दरोडेखोर दुकानातील रोख रक्कम घेऊन फरार झाले. जखमी अवस्थेत देखील कमलेश पुन्हा पोपट यांनी त्यांच्या मुलाला फोन केला परंतु तो कामात असल्याने त्याच्याशी त्यांचा संपर्क झाला नाही. परंतु त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या मुलाने त्यांना जखमी अवस्थेत पाहीले व त्याने कमलेश पोपट यांच्या मोबाईलवरुन मुलाला फोन केला यावेळी मात्र त्यांच्या मुलाने फोन उचलला त्याला ही घटना सांगितले. मुलगा तेथे आल्यावर कमलेश पोपट यांना जखमी अवस्थेत चिखलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. रात्री तीन वाजता जालना येथुन श्वानपथक आले होते. परंतु दरोडेखोरांनी काही पुरावे मागे न ठेवल्यामुळे हे श्वानपथक वापस गेले. मागील काही दिवसात बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. घाटावरचा प्रभार खामगावचे अपर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्याकडे असताना मागील दहा दिवसापासून घाटा खाली प्रमाणे घाटावर सुद्धा अवैध व्यवसायिकांनी आपली दुकाने गुंडाळून ठेवली होती. परंतु ते गेले तेव्हा पासून सर्व अवैध धंदे पूर्वपदावर आल्याचे चित्र दिसत आहे. कायदा व सुव्यवस्था याकडे सुद्धा पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.

Related posts

लोहार समाज बांधवांच्या विकासासाठी सदैव कटीबध्द – आमदार अँड आकाश फुंडकर…

nirbhid swarajya

खामगावात डि,बी पथकाची मोठी कारवा ईचोरी प्रकरणातील चार आरोपीसह मुद्देमाल जप्त…

nirbhid swarajya

भाजपचे स्विकृत नगरसेवक यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश; लॉकडाऊन मध्ये भाजपला धक्का

nirbhid swarajya
error: Content is protected !!