संग्रामपूर : तालुक्यातील जस्तगांव येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी- महाविद्यालय जळगांव जामोद येथे शिक्षण घेत असलेली अंतिम वर्षाची विद्यार्थिनी रेणुका प्रकाश डोसे हिने शेतकर्यांना कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून प्रात्यक्षिक करून दाखवले. जनावरांच्या दुधाचे उत्पादन तसेच शरीराची वाढ होण्यासाठी चाऱ्यातील पोषणमूल्यांची वाढ होणे गरजेचे आहे. निकृष्ट चाऱ्यात कर्बोदकांचे प्रमाण कमी आणि फायबर जास्त असतो. त्यामुळे कोरड्या चाऱ्यावर युरिया, गूळ, मीठ यांची प्रक्रिया करून कमी खर्चात व अगदी सोप्या पद्धतीने नत्राचे प्रमाण वाढून जीवनसत्व व प्रथिने यात वाढ होते. कृषिकन्या रेणुका डोसे हिने चाऱ्याचा दर्जा सुधारतांना शेतकऱ्यांच्या शंका दूर केल्या. त्यावेळी गावातील प्रकाश डोसे, दिनकर पाटील , एकनाथ पाटील , नितीन डोसे, उदय डोसे तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य वाय. आर.गवई सर,कार्यक्रम अधिकारी प्राचार्य अविनाश आटोले सर, समुपदेशक वि.टी. कपले मॅम, विषयतज्ज्ञ प्रा.एम.डब्ल्यू.आखूड सरांचे मार्गदर्शन लाभले.
previous post