November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने घरेलू महिला कामगार यासंदर्भात खा.सुप्रिया सुळे यांना निवेदन

खामगांव : बुलडाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवनामधे निष्ठावंत शिलेदारांचा सन्मान या कार्यक्रमास खा.संसदरत्न सुप्रियाताई सुळे आल्या असता त्या ठिकाणी पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे, रोहिणीताई खडसे,व जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी, महिला जिल्हध्यक्षा सौ.अनुजाताई सावळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या

मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश खरपाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ मध्ये नवीन योजनांचा समावेश करावा व तसेच त्या महामंडळाला बळकट करून समाजातल्या उपेक्षित घटकाला न्याय मिळवून द्यावा जेणेकरून त्या उपेक्षित घटकाचे कुटुंब शैक्षणिक सामाजिक व आर्थिक दृष्टीने सशक्त होईल या आशयाचे निवेदन सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आले.

यावेळी देवीलाल गोतमारे सर, माजी नगरसेवक अमोल बिचारे, सोशल मीडिया प्रमुख दिलीप पाटील, महिला अध्यक्ष सौ सुधाताई भिसे, मंगला ताई सपकाळ, तालुका युवक अध्यक्ष भगवान लाहुडकार, सय्यद मोहिउद्दिन, विजय कुकरेजा, मिर्झा अक्रम बेग, विजय चोपडे, जयराम माळशिकारे, आनंद तायडे, सय्यद सुलतान, यांची उपस्थिती होती.

Related posts

कोरोना बाबत खाजगी डॉक्टरांना मार्गदर्शन करणारी जिल्ह्यातील पहिली नगर पंचायत

nirbhid swarajya

कोतवालाला केलेल्या शिवीगाळाबद्दल कारवाई करण्याबाबतचे तहसीलदारांना निवेदन

nirbhid swarajya

पवित्र नात्याला काळीमा फासणारी घृणास्पद घटना!

nirbhid swarajya
error: Content is protected !!