November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश ताठे काँग्रेसच्या वाटेवर ?

खामगाव : भाजपा पदाधिकारी तथा सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश ताठे हे लवकरच भाजपाला “जय श्रीराम” करत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ताठे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यास सुटाळा वाडी सर्कलमध्ये मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत. सध्या सुटाळा वाडी सर्कलमध्ये मालूताई ज्ञानदेव मानकर ह्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सुटाळा वाडी सर्कल मध्ये मराठा समाजाचे वर्चस्व असल्याने या सर्कल मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून मराठा समाजाचा उमेदवार सातत्याने निवडून येत असतो. सध्या कार्यरत भाजपाच्या मालुताई मानकर ह्या मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. गणेश ताठे हेही मराठा समाजाचे आहेत. ते काँग्रेसमध्ये आल्यास आगामी जिल्हा परिषद निवडणूक रंजक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गणेश ताठे हे तालुक्यातील माक्ता येथील ग्रामपंचायत मध्ये दहा वर्षापासून सरपंच पदावर विराजमान आहेत. तसेच ते सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्षही आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खामगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना या गावातून अकराशे पैकी सहाशे मते मिळाली होती. तेव्हापासून गणेश ताठे यांच्यावर भाजप नेतृत्व नाराज असल्याचे समजते. सुटाळा वाडी सर्कलमध्ये होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस मधून माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन वाकुडकर,स्वप्निल ठाकरे,रामेश्वर दुतोंडे,सुनील पाटील व आदी पदाधिकारी इच्छुक आहेत, गणेश ताठे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची बाजू मजबूत होऊ शकते, असे बोलले जात आहे.

Related posts

ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणुन विद्यमान सरपंचांचीच नेमणुक करावी – सरपंच संघटनेची मागणी

nirbhid swarajya

धक्कादायक,कोरोनामुळे डोणगाव पोलीस स्टेशन सील,कामकाज मेहकर कडे दिले

nirbhid swarajya

बारादरी भागात पाणपोईचे उद्घाटन

nirbhid swarajya
error: Content is protected !!