January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

कडक शिस्तीचे एएसपी श्रवण दत्त येण्याआधी अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले

खामगांव : अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांची नुकतीच काही दिवसापूर्वी मुंबई येथे बदली झालेली आहे. त्यांच्या जागी जिंतूर येथून बदली झालेले श्रवण दत्त हे लवकरच खामगाव विभागाचा पदभार घेणार असल्याची माहिती मिळताच अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. श्रवण दत्त यांनी जिंतूर येथे एएसपी म्हणून सेवा देताना अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सक्त भूमिका बजावलेली आहे.

त्यांची ही ख्याती त्यांनी पदभार घेण्याआधीच खामगाव विभागात येऊन धडकली असून अवैध धंदे वाल्यांचे व गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. तर खामगावातील काही अवैध व्यवसायिकांनी आपला तळ दुसरीकडे हलविण्यास सुरुवात केल्याची चर्चा होत आहे. राज्य शासनाने दि.९ सप्टेंबर रोजी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि बुलडाण्याच्‍या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्‍यांच्‍या जागी दोन नवे अधिकारी बदलून येणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांची पोलीस उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. तर बुलडाणा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

एएसपी राजपूत यांचे जागी जिंतूर येथून श्रवण दत्त हे लवकरच पदभार घेणार असल्याची माहिती आहे. तर बरकते यांच्या जागी अकोला येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम सांभाळलेले सचिन कदम हे येणार आहेत. श्रवण दत्त यांनी जिंतूर येथे सेवा बजावताना अवैध धंदे तकड बंद केले होते तर गुन्हेगारीवरही वचक निर्माण केला होता. श्रवण दत्त हे कडक शिस्तीचे अधिकारी मानले जातात. गुन्हेगार मग तो राजकीय क्षेत्रातला असो की सामाजिक क्षेत्रातला नामांकीत असो की कुणीही असो गुन्हा दाखल करण्यासाठी ते जराही कचरत नाहीत. कार्य करण्याची त्यांची कार्यशैली म्हणजे, कोणतीही कारवाई पूर्ण होईपर्यंत ते कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोन उचलत नाहीत किंवा मीडियाला भणक लागू देत नाहीत. तसेच कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत असणाऱ्या स्टाफ मधील सर्वांचे मोबाईल स्वीच ऑफ असतात. रेड च्या ठिकाणी तावडीत सापडलेल्या अवैध व्यवसायिकांचे ते कपडे सुद्धा काढून घेतात, अशी त्यांच्या बद्दल चर्चा खामगावात येऊन पोहचली आहे. त्यामुळे खामगाव शहरासह खामगाव विभागातील व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. तर सामान्य व सभ्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्याला लाभलेले पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्याप्रमाणेच त्यांची कार्यशैली असल्याची माहिती असून ते खामगाव विभागात काम करताना विभाग अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मुक्त करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related posts

मंडळ अधिकारी व तलाठी यांना लाच घेताना अटक

nirbhid swarajya

बाजार समितीतील संभाव्य प्रशासकांची यादी जाहीर

nirbhid swarajya

स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात पंचायत समितीच्या प्रचार रथाने…

nirbhid swarajya
error: Content is protected !!