January 6, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

धरणात बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

मेहकर : तालुक्यात येणाऱ्या देऊळगाव साकर्शा जवळ असलेल्या प्रकल्पामध्ये एक २२ वर्षीय युवक बुडाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव साकर्शा जवळ असलेला उतावळी प्रकल्प पाहण्यासाठी खामगांव मधील चार मित्र हे त्या ठिकाणी गेले होते. धीरजसिंग राममोहनसिंग ठाकूर वय २२ रा. एकता नगर हा आपले मित्र इमरान अली, अन्वर खान, जुगल जांगिड या मित्रांसह तो उतावळी प्रकल्प पाण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी प्रकल्पाच्या सांडव्यात सर्व मित्र उतरले असता यामध्ये धीरजसिंग याचा पाय घसरून तो सांडव्याच्या डोहात पडला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो पूर्णपणे बुडाला होता. घटनेची माहिती मिळताच देऊळगाव साकर्शा चे सरपंच संदीप अल्हाट, तलाठी बी एम माने, पोलीस पाटील गजानन पाचपोर, सागर पायघन, शैलेश राठोड, रमेश काळे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत त्याचे शोधकार्य सुरू होते मात्र पाऊस सुरू असल्याने त्या ठिकाणी शोधकार्याला फार मोठी अडचण येत होती. आज सकाळी पुन्हा त्याचे मृतदेहाचा शोध कार्य सुरू केले असता सकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह धरणामध्ये मिळणारा मिळून आला. या ठिकाणी प्रशासनाकडून कुठलेही निर्बंध नसल्याने येणारे पर्यटक नेहमीच असुरक्षित पद्धतीने वावरत असतात. मात्र स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी लक्ष न दिल्याने आज एकाचा बळी गेला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहेत. तसेच सदर उतावळी धरण हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी सुद्धा आता ग्रामस्थांकडून होत आहे.

Related posts

अखेर प्रोफेशनल टीचर असोसिएशनची मागणीला यश

nirbhid swarajya

पालकमंत्र्यांनी स्वतः बाजारात जाऊन केली जनजागृती

nirbhid swarajya

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत चि.हिमांशु वनारे राज्यातून ६२ वा मेरिट

nirbhid swarajya
error: Content is protected !!