January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शेतकरी

स्वाभिमानीचे राणा चंदन यांचे दुःखद निधन

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा शाखेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंद्रशेखर चंदन यांनी आज पहाटे औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी त्यांचे वय ३४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, २ भाऊ, पत्नी व दोन मुली त्यात एक ३ वर्षाची व एक १ वर्षाची आहे.

राणा चंद्रशेखर चंदन हे गत महिनाभरापासून किडनी विकार व स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. बुलडाणा व नंतर औरंगाबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. गत दोन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटर अर्थात जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. राणा चंदन हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे उजवी हात समजले जात होते,

विविध शेतकरी व युवकांच्या आंदोलनात राणा आक्रमकपणे कायम आघाडीवर असायचा, रुग्णांसाठी व कोणत्याही सरकारी कामासाठी धावून जाणारा हा रस्त्यावरचा युवा कार्यकर्ता म्हणूनही राणाची ओळख होती. त्यामुळे त्याच्या आजाराचे वृत्त समजताच पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. संजय गायकवाड माजी आमदार विजयराज शिंदे, राजश्री पतसंस्थेचे संदीप शेळके यांच्यासह विविध नेते व मान्यवरांनी औरंगाबादला जाऊन राणाची भेट घेऊन उपचारासाठी आर्थिक मदतही केली, परंतु उपचाराचा मोठा भार हा सर्वस्वीपणे रविकांत तुपकर यांनी उचलला..

पण एवढे सर्व करूनही राणाचा आजार बळावतच गेला व अखेर त्याने या जगाचा निरोप घेतला. राणा चंदन यांचे पार्थिव दुपारपर्यंत औरंगाबाद वरून बुलडाण्याला आणण्यात येणार असून, नंतर ते स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटरच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर पार्थिवाला घरी नेऊन सायंकाळी ५ वाजता संगम तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राणा चंदन यांना निर्भिड स्वराज्य परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…!

Related posts

नागरीकांकडून घेतली जाते पोलिसांची काळजी

nirbhid swarajya

आज प्राप्त ३२ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर एक पॉझीटीव्ह

nirbhid swarajya

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामातून कोट्यावधी रुपयांचे धान्य गायब

nirbhid swarajya
error: Content is protected !!