January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई येथील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा – पत्रकार संघटनेची मागणी

मलकापूर : मुंबई येथील पत्रकार शहाबज दीवकर यांच्यावर कसारा रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात गुंडाकडून प्राणघातक भ्याड हल्ला करण्यात आला. या सर्व घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कडक कारवाई करा अशी मागणी राष्ट्रीय विश्वगामि पत्रकार संघटनेच्या वतीने मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, राज्यात निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर अवैध व्यवसायिक, बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्ती कडून अथवा त्यांच्या गुंडांकडून हल्ले केले जातात.

अथवा पत्रकारांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक होऊन विनाकारण त्रास दिला जातो. यावेळी पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा ग्रामीण पत्रकारांना अधिस्विकृतीधारक पत्रकार म्हणून लाभ मिळावा यूट्यूब न्यूज चैनल ची अधिकृत नोंदणी करून त्यांना पत्रकारिता क्षेत्रात सामावून घेण्यात यावे. राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन चा दर्जा मिळावा. राज्यातील सर्व शासकीय इमारती मध्ये स्वतंत्र पत्रकार भवन स्थापन करावे शासकीय विश्रामगृहात पत्रकारांना निशुल्क प्रवेश देण्यात यावा. राज्यातील प्रत्येक तालुका व जिल्हा पत्रकारांसाठी स्वतंत्र शासकीय विश्रामगृह उभारावे. पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी. केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात यावा रेल्वेमध्ये पत्रकारांना मोफत प्रवेश देण्यात यावा वयोवृद्ध पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करण्यात यावी. शासकीय नोकऱ्यांमध्ये पत्रकारांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे.

शैक्षणिक प्रवेशमध्ये पत्रकारांच्या कुटुंबीयांना प्राधान्य देण्यात यावे श्रमिक पत्रकार यांची पत्रकारिता च्या उत्पन्नावर उदरनिर्वाह अवलंबून आहे. अशा पत्रकारांना शासकीय योजनांमध्ये प्रमुख्याने लाभ मिळवून देण्यात यावा कोरोना च्या काळात मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यात यावी. यासह अनेक समस्या बाबतचे निवेदन यावेळी राष्ट्रीय विश्वगामि पत्रकार संघटने तर्फे देण्यात आले. यावेळी विदर्भ सचिव उल्हास शेगोकार, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश दांडगे, जिल्हा सचिव श्रीकृष्ण भगत, जिल्हा उपाध्यक्ष अजय टप, जिल्हा कार्याध्यक्ष करणसिंग सिरसवाल, समद कुरेशी, रोषण वाकोडे ,प्रसिद्धीप्रमुख दीपक इटणारे, हनुमान भगत, अपरेश तुपकरी यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

अजय तीतरे यांच्या प्रसंगावधानतेने वाचले हरणाच्या लहाण पाडसाचे प्राण…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 304 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

४२ जनावरे घेऊन जाणारे कंटेनर पकडले…

nirbhid swarajya
error: Content is protected !!