November 21, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शिक्षण सामाजिक

वाडी येथे अवैध दारू विक्री जोरात

खामगाव : येथून जवळच असलेल्या वाडी गावांमध्ये अवैध देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री जोरात सुरु असल्याचे तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. युवा पिढीचे तरुण दारूच्या अधीन जात आहे. त्यामुळे युवकांचे जे उजळणारे भविष्य आहे ते अंधारातच जात आहे. दारू पिणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे, हा त्यांचा व्यवसाय झाला असून या भागातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सोबतच यामुळे वाडी गावात रस्त्याने ये जा करणाऱ्या स्त्रियांना व विद्यार्थिनींना सुद्धा त्रास होत आहे. त्यामुळे भीतीपोटी कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही आहे. वाडीमध्ये पाच ते सहा लोक अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतात. परंतु त्यांच्या अवैध दारूविक्रीच्या कारणामुळे सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासर्व गोष्टीकडे पोलीस विभाग अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा वाडी येथील गावकऱ्यांमध्ये सुरु आहे. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य सुद्धा या अवैध दारू विक्री कडे दुर्लक्ष करीत आहे.

यामुळे युवा पिढीचे सर्वदृष्टीने नुकसान होत आहे. अगदी १४ ते १५ वयोगटातील मुले सुद्धा दारूच्या अधीन गेले आहेत. वेळेवर प्रशासन जागे झाले नाही तर वाडी गाव हे संपूर्ण दारूच्या पुरामध्ये बुडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व बाबींकडे वरिष्ठांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून वाडी गावात सुरु असलेल्या अवैद्य देशी व विदेशी दारू विक्री बंद करावी अशी मागणी वाडी येथील गावकऱ्यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना केली आहे.

Related posts

ज्ञानगंगापुर ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्ह्यातील प्राचीन मशिद

nirbhid swarajya

उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार

nirbhid swarajya
error: Content is protected !!