January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय सामाजिक

डॉ.अमजद खान पठाण यांना मुंबई रत्न पुरस्कार

सिंदखेड राजा : मातृतीर्थ येथील राष्ट्रीय एकता आणि सर्वधर्म समभावाचे प्रणेते तथा हजरत गौस ए आजम दस्तगीर बाबा दर्गा चे संस्थापक विश्वशांती राजदूत हजरत अल्हास असदबाबा यांचे चिरंजीव डॉ.अमजद खान पठाण यांना सामाजिक आणि संशोधन कार्यासाठी “मुंबई रत्न” पुरस्कार महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे देण्यात आला. यावेळी रतन टाटा,आदी गोदरेज, नवल बजाज, निरंजन हिरानंदानी, पद्मश्री एडवोकेट उज्वल निकम, गायक उदित नारायण, अनुप जलोटा,युनियन बँकेचे चेअरमन राजकिरण रेजी, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल यांनाही मुंबई रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ.अमजद खान पठान हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांनी आपल्या परिश्रम व जिद्दीने सामाजिक सलोखा निर्माण केला, तसेच मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहून कर्करोगावर विविध संशोधनाने केली आहेत. आपल्या सक्रिय कार्यशैली व कर्करोग शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या कार्याने मुंबईसह राज्यभरातील दिग्गजांच्या यादी डॉ. पठाण यांचे नाव समाविष्ट झाल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. मुंबई-पुण्यात खर्चिक उपचारासाठी जाणे सामान्य कुटुंबीयांना न परवडणारे आहे. नसलेला पर्याय आणि येणाऱ्या रुग्णांचे होणारे हाल वेदना बघून डॉ. पठाण यांनी विदेशात नोकरी करणे नाकारले आणि आपल्या मातृभूमीत रुग्णांसाठी आपण देणे लागतो या उद्देशाने त्यांनी मोफत कर्करोग, किडनी रोग तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबिर दरवर्षी आयोजित करतात. गेल्या सहा वर्षात जवळपास ३५ हजार कॅन्सल रुग्णांवर मोफत उपचार व मार्गदर्शन त्यांनी केले आहे. दरवर्षी शिबिराचे आयोजन करून विदर्भ, मराठवाड्यातील गोरगरीब जनतेला मदतीचा हात दिल्याबद्दल आसाम बुक ऑफ ऑफ रेकॉर्डने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठित “द मोस्ट पॉप्युलर इंडियन अवार्ड” २०२० ने सन्मानित केले.

डॉ. पठाण यांनी कोरोना काळामध्ये अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. कोरोना योद्धा म्हणून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले आहे. डॉ.अमजद खान पठाण यांना आतापर्यंत जवळपास ५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. त्यांना नुकताच तुर्की ने मानवता सेवेसाठी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. तसेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर डेव्हलपमेंट ब्राझील यांनी पीएचडी इन मेडिसिन देऊन त्यांचा गौरव केला आहे. तसेच तीन देशांच्या विश्वशांती दूत पदाने सुद्धा त्यांना गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने डॉ.पठाण यांचे विविध राज्यातून तसेच परदेशातून कौतुक होत आहे. डॉ. अमजद खान पठाण यांचे वडील कर्मवीर भारत गौरव हजरत अल्हास असदबाबा यांचे स्वप्न आणि लाखो रुग्णांच्या निस्वार्थ सेवेचा वसा घेऊन त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची म्हणुन सिंदखेड राजा मध्ये लवकरच चॅरिटेबल कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा त्यांचा मानस आहे. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी संपूर्ण मोफत उपचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच देशातील आणि परदेशातील नामांकित तज्ञ डॉक्टर सुद्धा कॅन्सर हॉस्पिटल ला आणि रुग्णांसाठी आपली सेवा देणार असल्याचे डॉ.अमजद खान पठाण यांनी निर्भिड स्वराज्यशी बोलताना सांगितले.

Related posts

कांद्यावरील निर्यात शुल्क मागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी…

nirbhid swarajya

वाढदिवसानिमित्य जिजाऊ सृष्टी विकासकामाकरिता एक लाखांची देणगी

nirbhid swarajya

कोरोना लस घेतलेला कर्मचारी पॉझिटिव्ह !

nirbhid swarajya
error: Content is protected !!