November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई राजकीय

आ. गायकवाड यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी एकत्रीकरण मंचातर्फे निवेदन

मलकापुर : खामगाव तालुक्यातील चितोडा गावात वाघ आणि हिवराळे कुटूंबात झालेल्या वादातून बुलडाणा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड ह्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यांनी खोट्या अट्रोसिटी विरोधात केलेल्या वक्तव्यांवरून समाजात जातीय तणाव वाढवुन संजय गायकवाड आणि पोलीस प्रशासनला अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी या करीता
येथील हिंदुत्ववादी एकत्रीकरण मंचातर्फे आज उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना निवेदन देण्यात आले.

तणाव निर्माण करणारे ठराविक लोक संविधानिक पद्धतीने शिक्षा झालेल्या नक्षलवाद्यांचे सुद्धा समर्थन आहेत. तरी ह्या सर्व लोकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी आणि ह्यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. अश्या आशयाचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी मलकापुर यांना देण्यात आले. यावेली यशवंत थोरबोले, अमोल भाऊ टप,निलेश अमराले, ओम शिंदे, विशाल घुले शुभम लाहुडकर, संतोष साठे, यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

विना परवाना शस्त्र व हत्यार बाळगणार्‍या दोघांना अटक

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त १८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

व्हाट्सएपच्या माध्यमातून लग्न लावून देण्याचं आमिष इंदोरच्या तरुणाला महागात

nirbhid swarajya
error: Content is protected !!