November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा शेतकरी

तलाठयाने घेतली ५०० रु.ची लाच

खामगाव : महसूल विभागात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून एका तलाठयाने सर्व सीमा ओलांडत शेतकऱ्याकडून ५०० रु.ची लाच घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर तलाठयास एसीबीने रंगेहात अटक केली आहे. तलाठी हा ग्रामीण भागातील एक
महत्वाचा कर्मचारी आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळया कामांसाठी तलाठयाकडून सातबारा, आठ अ नमुना यासह विविध कागदपत्रे घ्यावी लागतात. तसेच शेतीसंबंधी नोंदी करण्यासाठीही तलाठयाकडे जावे लागते. मात्र अनेक तलाठी शासनाचा पगार असतांनाही कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळतात. काही नोंदी करायच्या असल्यास लाच घेतात. पैसे घेतल्याशिवाय तलाठी कामच करीत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. काही तलाठी इमानइतबारे काम करतात मात्र त्यांची संख्या फार कमी आहे.

जास्त प्रमाणात तलाठी पैशांशिवाय शेतकऱ्यांची कामे करीत नाहीत. तालुक्यातील खेर्डी येथील एका शेतकऱ्याकडून मृत्यूपत्रात नोंद करण्यासाठी तसेच सात-बाऱ्यावर विहिरीची नोंद करुन देण्यासाठी तलाठी गजानन नारायण मान्टे ४३ रा. तायडे कॉलनी यांनी ७०० रु.ची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५०० रु. देण्याचे ठरले. दरम्यान याबाबत संबंधीत शेतकऱ्याने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरुन एसीबी पथकाने आज सापळा रचून जळकातेली येथे तलाठी मान्टे यांना तक्रारदार शेतकऱ्याकडून ५०० रु. ची लाच घेतांना रंगेहात अटक केली. ही कारवाई एसीबीचे पीआय सचिन इंगळे, विलास साखरे, मोहम्मद रिजवान, विनोद लोखंडे, अझरोद्दीन काझी, स्वाती वाणी,नितीन शेटे यांनी केली. या कारवाईची महसूल वर्तुळासह सर्वत्र चर्चा होत आहे.याप्रकरणी वृत्त लिहेपर्यंत पुढील कार्यवाही सुरु होती.

Related posts

शिवाजी नगर पोलिसांनी केला गुटखा जप्त

nirbhid swarajya

क्रिकेट अकॅडमीचे विद्यार्थी जळगावात चमकले

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त ०६ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!