निर्भिड स्वराज्यच्या बातमीचा इम्पॅक्ट
खामगाव : येथील नगरपालिका असलेल्या व्यापारी संकुलाला दिलेल्या नावांमध्ये मोठी अक्षम्य चूक असल्याची बातमी निर्भिड स्वराज्यने काही दिवसांपूर्वी लावली होती. निर्भिड स्वराज्यच्या याच बातमीची दखल घेतली आणि नगरपालिकेने या नावांमध्ये सुधारणा केली आहे. मात्र व्यापारी संकुलच्या नावांमध्ये सुधारणा करण्यामधे पुन्हा एकदा दुर्लक्षित केले आहे. येथील नांदुरा रोड वरील जुन्या नगर परिषदेसमोर तयार केलेल्या व्यापारी संकुलाच्या नावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावामध्ये फार मोठी अक्षम्य चूक असल्याचे दिसले होते. सदर नाव हे ” छत्रपता शिवाजी महाराज ” असे झाले होते.

निर्भिड स्वराज्यने याबाबत बातमी लावली असता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली व ताबड़तोब त्यांनी नावात बदल केला आहे. मात्र सोबतच नगरपालिका व्यापारी संकुल लिहिलेले अक्षरात चूक असल्याचे निदर्शनास आले नाही. नगरपालिकेने “छत्रपती शिवाजी महाराज या नावात सुधारणा केली असली तरी व्यापारी संकुलाच्या नावाताली चुक लक्षात कशी आली नाही याचे मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. व्यापारी संकुल समोर नगर परिषदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी चहा घेण्यासाठी येत असतात मात्र या नगरपालिका संकुल नावाकडे सुद्धा कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एकंदरीतच नगरपालिकेचा पुन्हा एकदा दुर्लक्षित पणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ नावामध्ये सुद्धा दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.