April 19, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शेतकरी

सोयाबीन बियाण्यांचे बोनस शेतकऱ्यांना तातडीने द्या- भाजप किसान आघाडीचे निवेदन

खामगाव : सन २०२१-२०२२ सोयाबीन बियाण्यांचे बोनस शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी बुलडाणा भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शनात किसान आघाडीच्या वतीने देण्यात आले. सन २०२१- २०२२ चालु खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनचे सार्वजनिक बियाणे (महामंडळचे बियाणे) अतिशय कमी प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध झाले होते.जिल्ह्यात १०,४१७ क्विंटल बियाणे सर्टिफाईड बियाणे-६,८८३ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले होते.व खाजगी (कंपन्यांचे) बियाणे ७०,१३८ क्विंटल बियाणे पेरणीसाठी उपलब्ध झाले होते. सरकारी बाजार भावानुसार सार्वजनिक बियाण्यांचे भाव २२००/-रूपये पर थैली प्रमाणे होते. तर खाजगी बियाण्यांचे भाव ३३००/- रूपये ते ३८००/- रूपये बाजार भावाने विक्री झाली. करिता कास्तकारांना ११००/-रूपये ते १६००/- रुपये सरकारकडून शेतकऱ्यांना बोनस स्वरूपात रक्कम परत करण्यात यावी. जिल्ह्यात ३,८५,१३२/-हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे.या कास्तकारांना बियाण्यांच्या किमतीमध्ये खुप मोठा फरक व पैसे मोजावे लागले.

दरवर्षी सार्वजनिक (महामंडळचे बियाणे) ४५०००/-क्विंटल बियाणे उपलब्ध असते. तसेच १५०००/- सर्टिफाईड बियाणे उपलब्ध असते. यावर्षी सदर बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. तरी कास्तकारांच्या खात्यामध्ये बियाण्यांचे बोनसचे पैसे उपलब्ध करून देण्यात यावे. अन्यथा जिल्ह्यात भाजपा किसान मोर्चा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील. असा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला. यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे, किसान आघाडी जिल्हाअध्यक्ष गजाननराव देशमुख, जिल्हा महामंत्री चक्रधरजी लांडे, सरचिटणीस बळीरामभाऊ लाहुळकार, किसान मोर्चा प्रदेशसचिव दिपकजी वारे, दत्ताभाऊ पाटील किसान मोर्चा महीला आघाडीच्या सौ.संगिताताई उबंरकार, जिल्हा सचिव संदीप जोशी ,जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब सांबरे पाटील , खामगाव तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे व जिल्ह्यातील जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

या पत्रकार डॉक्टरचीचं प्रसूती करण्याची वेळ आली आहे?

nirbhid swarajya

ओटीपी देणे पडले महागात

nirbhid swarajya

बुलढाणा अर्बन च्या वतीने वैशाखी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

nirbhid swarajya
error: Content is protected !!