April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय सामाजिक

नगर पालिकेच्या व्यापारी संकुलाच्या नावांमध्ये मोठी चूक

खामगाव : येथील नगरपालिका असलेल्या व्यापारी संकुलाला दिलेल्या नावांमध्ये मोठी अक्षम्य चूक असल्याचे दिसून आले. नांदुरा रोड वरील जुन्या नगर परिषदेसमोर तयार केलेल्या व्यापारी संकुलाच्या नावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावामध्ये फार मोठी अक्षम्य चूक असल्याचे दिसून आले आहे. सदर नाव हे ” छत्रपता शिवाजी महाराज ” असे झाले असून अजून पर्यंत नगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला याबाबत माहिती नाही व य्या कडे लक्ष सुद्धा दिले नाही आहे. सोबतच नगरपालिका व्यापारी संकुल लिहिलेले अक्षरात चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. या व्यापारी संकुल समोर नगर परिषदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी चहा घेण्यासाठी येत असतात मात्र या नावाकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून आले आहे

. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावामध्ये अक्षम्य चुक असल्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे नाव असेच असल्याचे जवळपासच्या नागरिकांनी नगरपालिकेला सांगितले होते. याबाबत वारंवार सांगूनही याकडे नगरपालिका लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे एकंदरीतच नगरपालिकेचा दुर्लक्षित पणा व ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य समजून नगरपालिकेने तात्काळ नावामध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Related posts

श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना च्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस….

nirbhid swarajya

प्रेतांचे पोस्टमार्टम करणाऱ्या मो. अफसरचे दातृत्व

nirbhid swarajya

ग्रामपंचायत उपसरपंचांची निवडणूक ६ जानेवारीला…

nirbhid swarajya
error: Content is protected !!