January 6, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई सामाजिक

मराठी पत्रकार संघाच्या वतीने डॉ.गुलाबराव पवार यांचा विशेष सन्मान

खामगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला. या महामारीच्या काळात देवदूत ठरलेले डॉक्टर, अधिकारी, समाजसेवक तसेच पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी ‘सन्मान देवदुतांचा’ हा सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात आपण दिलेल्या योगदानाबद्दल या सोहळयात येथील डॉक्टर गुलाबराव पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी सत्कार करत डॉ.पवार यांना शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून गौरविले. डॉ. गुलाबराव पवार यांनी कोरोना काळात बडया पगाराची नोकरी सोडून खामगाव सामान्य रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये सेवा दिली.त्यांच्या या आरोग्यसेवेबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Related posts

कोविड लसीकरणाच्या तयारीसाठी ‘रंगीत तालीम’

nirbhid swarajya

खामगाव राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्ताराचा निषेध करत केले आंदोलन…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 52 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 02 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!