November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

आजपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद !

कडधान्याच्या साठेबाजीवर सरकारने आणल्या मर्यादा

केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारीवर्गाकडून विरोध

खामगांव : वाढती महागाई आणि साठेबाजीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने मूग वगळता इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. हा निर्णय ठोक, किरकोळ विक्रेत्यांसह आयातदार आणि दालमिलच्या मालकांसाठी ऑक्टोबर २०२१ पर्यंत लागू राहणार आहे. केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाकडून या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला असून, तो तत्काळ प्रभावाने लागूही करण्यात आला आहे.

केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारीवर्गाकडून विरोध करण्यात येत असून, या निर्णयाच्या निषेधार्थ आज सोमवार, ५ जुलैपासून बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहे. कोरोना कालावधीत सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. डाळींचे वाढते दर कमी करण्यासाठी सरकारने डाळींवर स्टॉक लिमिट घातली आहे. हा आदेश तातडीने अंमलात आणला गेला आहे. हे घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, गिरणी मालक आणि आयातदारांसाठी लागू केले आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या संदर्भातील एक आदेश जारी केला आहे.

त्यानुसार डाळींचा साठा करण्याची मर्यादा तातडीने अंमलात आणली गेली आहे. आता घाऊक विक्रेत्यांसाठी २०० टन डाळींची साठवणूकीची मर्यादा असेल. तथापि, यासह अशी अट असेल की, तो एकाच डाळीचा २०० टन संपूर्ण स्टॉक ठेवू शकणार नाही. डाळींचे वाढते दर लक्षात घेता सरकारने मूग वगळता इतर डाळींवर ३१ ऑक्टोबरपर्यंत साठवणूकीची मर्यादा घातली आहे. आता शासनाने ठरविलेल्या मर्यादेपेक्षा व्यापाऱ्यांना कोणत्याही डाळी वा डाळींचा साठा ठेवता येणार नाही. केंद्र सरकारने लागू केलेल्या या शेतमाल स्टॉक लिमिटच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी आज सोमवार, ५ जुलैपासून बाजार समित्या बंद ठेवण्याबाबत अर्ज दिला आहे. त्यामुळे सोमवारपासून पुढील सूचनेपर्यंत बाजार समित्यांमधील खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार बंद राहणार आहे.

Related posts

कृउबास व्यापारी राजेश टावरी यांची आत्महत्या

nirbhid swarajya

जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा आविष्कार…

nirbhid swarajya

डॉक्टराने दिला विठ्ठलाला प्रसाद..

nirbhid swarajya
error: Content is protected !!