व्हायरल क्लिप मध्ये मुख्यमंत्र्याच्या मातोश्री निवासस्थान व गृहराज्यमंत्र्यांच्या उल्लेख…
खामगांव : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर चालणारं सरकार म्हणून महाविकास आघाडीची ओळख आहे. सत्तेत शिवसेने सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 पुरोगामी विचारांचे पक्ष सुद्धा आहेत. असे असतांना देखील सत्ताधारी पक्षाच्या एका शिवसेना आमदाराने ऍट्रॉसिटी बाबत धक्कादायक वक्तव्य केल्याचं एक व्हीडिओ नुकताच समोर आलाय. विशेष म्हणजे हा शिवसेना आमदार एवढ्यावरच थांबला नाही, तर पुढे बोलतांना मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता मातोश्रीवरून मला फोन आलाय, म्हणून मी इथं आलोय. तसेच गृहराज्यमंत्र्यांचा देखील स्पष्ट उल्लेख या व्हीडिओ मध्ये करण्यात आल्याचे दिसतंय. यामुळं प्रश्न हा उपस्तिथ होतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याचं सांगण्यावरून हा आमदार ऍट्रॉसिटी कायद्याला विरोध तर करत नाही ना? मात्र यांमुळे पुन्हा एकदा राज्यात सत्ताधारी पक्षानेच पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर ऍट्रॉसिटी वर काँट्रॅव्हर्सि निर्माण केल्याचं चित्र दिसतंय. विदर्भातील बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांनी भिन्न समाजातील कौटुंबिक वाद झालेल्या कुटुंबाला भेट दिली. खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापुर येथे दोन कुटुंबात आपसी वाद निर्माण झाला होता.

यावादात गावातील घर व वाहनांची जाळपोळ व तोड़फोड़ करण्यात आली होती, त्यामुळे पीड़ित वाघ कुटुंबियांना भेट देण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी हजारो समर्थकांनसह शेकडो गाड्यांचा ताफ्या सोबत भेट घेतली व परिस्थितिची पाहणी केली. मात्र यामुळं काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं असल्याचं चित्र बघायला मिळालं. खरं तर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गावात जाऊन दोन्ही समाजाच्या लोकांना सोबत घेऊन हा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. मात्र गरज भासल्यास अस्त्र-शस्त्रासह १० हजार कार्यकर्त्यांची फौज घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहीन. कुणी ऍट्रॉसिटी करत असेल तर तुम्ही सुद्धा समोरच्यावर खोटे रॉबरीचे गुन्हे दाखल करा, ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात 2 दिवसात जमानत होऊन जाईल, पण रॉबरीच्या गुन्ह्यात 3 महिने सुद्धा यांची जमानात होणार नाही. त्याठिकाणी कोणता ठाणेदार गुन्हा दाखल करत नाही ते आम्ही बघून घेऊ असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यानं राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.