खामगांव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेश हेलोडे व मित्र परिवार यांच्या वतीने वंचितचे प्रदेशाध्यक्ष तथा पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती मधील माजी कर्मचारी यांना तीन चाकी सायकल भेट देण्यात आली आहे. खामगांव मधील कृ उ बा स चे माजी कर्मचारी रमेश नागो अवचार यांना अपंगत्व आल्याने त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. ही बाब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेश हेलोडे यांच्या लक्षात आली व त्यांनी भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी चे पार्लमेंट्री बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना तीन चाकी सायकल भेट दिली.

तसेच सोबतच त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांची दोन वेळेचे जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. यावेळी वंचितचे शरद वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे,कृ उ बा स चेमाजी संचालक राजेश हेलोडे,संघपाल जाधव, प्रभाकर वरखेडे, दादाराव हेलोडे, राहुल सावंत, दगडु सरदार,विक्रम नितनवरे,बब्बु पहेलवान,शे अहमद, किशोर हेलोडे, सुनिल लांडगे, किशोर तायडे, दिनेश हेलोडे, महादेव सावरकर,गोलु महातो,हर्ष खंडारे, विष्णू गवई,बबन घोडेचोर, जनार्दन जाधव, संतोष जाधव,राम वानखेडे, बापू खोसे,भारत बाभुळकर, हरिभाऊ पाटील,विनोद जाधव ,प्रल्हाद जाधव, लखन हेलोडे,व समस्त श्रमिक कामगार संघटना चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती अमन हेलोडे यांनी दिली आहे.