January 1, 2025
खामगाव गुन्हेगारी जळगांव जामोद जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शेगांव संग्रामपूर

माजी आ. सानंदा यांची रेती घाटांवरील रेती साठ्यांवर धाडी

परवानगीपेक्षा जास्त रेतीची साठवणूक ! महसूल मंत्र्यांनी घेतली दखल

जिल्हा प्रशासनाकडून रेती साठ्याचे स्थळ निरिक्षण

जप्त केलेला रेतीसाठा गेला चोरीस
७१० ब्रास अधिक रेतीचा साठा

खामगांव : बुलढाणा जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन वाढीस लागले असतानाच, गौण खनिज उत्खननाची परवानगी असलेल्या रेतीसाठ्यातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन आणि साठवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची रेती घाटांवरील रेती साठ्यांवर धाडी घालीत उजेडात आणला. यावेळी शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ४ रेती साठे ९ ठिय्यांचे नव्याने स्थळनिरिक्षण आणि पंचनामे करण्यात आले. त्यामुळे रेती माफीया आणि महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील रेती घाटातून क्षमतेपेक्षा रेतीचा उपसा केल्या जात असल्याची तक्रार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती . या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ स्थळ निरिक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासनाला रेती घाट, रेती साठवणुकीचे ठिय्ये यांचे नव्याने स्थळ निरिक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी या ऑपरेशनची माहिती लीक न होऊ देता खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी शासकीय अधिकारी आणि पत्रकारांना सोबत घेत रेती घाटांवरील रेती साठ्यांवर धाडी घातल्या. त्यामुळे रेती माफीया आणि महसूल विभागात एकच खळबळ उडाली. यामध्ये शेगाव तालुक्यातील बोंडगाव रेती घाट, सोगोडा रेती घाट, संग्रामपूर तालुक्यातील ईटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटातून परवानगी पेक्षा अधिक रेतीची उचल करण्यात आल्याचे समोर आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेती साठे आणि रेती घाटांचा पंचनामा तसेच जीपीएस यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी केली.

जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईत खामगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जळगाव येथील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे, संग्रामपूर येथील उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधिन अधिकारी तेजश्री कोरे, संग्रामपूरचे तहसीलदार विजय चव्हाण, यांच्यासह बांधकाम विभाग, महसूल विभाग वनविभाग आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी करण्यात आलेल्या पाहणीत जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड रेती घाटातून रेती उपसासाठी खामगाव येथील समीर दुष्यंत दलाल यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच भास्तन येथे १२०० ब्रास रेतीसाठा साठवणुकीची परवानगी देण्यात आली. मात्र, या रेतीच्या ठिय्यावर प्रत्यक्षात १९०० ब्रास रेतीचा साठा आढळून आला. त्यामुळे याठिकाणी चक्क ७१० ब्रास रेतीसाठा अधिक आढळला. तर शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची उचल करण्यात आली. नियमावलीनुसार एक मीटरपर्यंत उत्खन्नाची परवानगी असताना प्रत्यक्षात साडेसहा फुटापर्यंत रेतीचे उत्खनन करण्यात आले. महसूल आणि वन जमिनीवर देखील मोठ्याप्रमाणात उत्खनन करण्यात आले तर शासनाने जप्त केलेले रेतीचे साठे हि चोरीला गेल्याचे स्थळ निरिक्षणात समोर आले.

Related posts

टीम एक वादळ भारताचं या चळवळीच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला

nirbhid swarajya

खामगाव शहरात मान्सून पूर्व पावसाच्या सरी

nirbhid swarajya

आणि तिचा वाढदिवशीच कोरोनाने घेतला बळी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!