मलकापुर (हनुमान भगत) : बेलाड व आजूबाजूच्या परिसरात हिंसक प्राण्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला असून आज बेलाड येथील ४० वर्षीय महिलेवर रानडुकरांचा प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये सदर महिलेचा रानडुकरांनी हात तोडला असून महिलेला गंभीर जखमी सुद्धा केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलकापुर तालुक्यातील बेलाड शिवारात शेतकऱ्यांच्या पेरणीचे दिवस असल्याने काही महिला शेतीमध्ये पेरणी करण्यासाठी जात होत्या. शेतामध्ये जात असताना सुनिता अर्जुन संबारे ह्या महिलेवर अचानक पणे रानडुकराने हल्ला चढवला. हा हल्ला इतका जोरदार होता की रानडुकराने त्यांचा हात शरीरापासून तोडला आहे. त्यानंतर काही लोकं धावून आल्याने त्या महिलेचे प्राण वाचले आहे. या हल्ल्यात सुनिता अर्जुन संबारे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तात्काळ त्या महिलेला उपचारासाठी जळगाव खान्देश येथे रेफर करण्यात आले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून जंगली प्राण्यांचा सुळसुळाट सुरू आहे. सदर घटनेमुळे बेलाड व आजूबाजूच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांन पहिले या भागात हरणांचा कळप मोठ्या संख्येने येऊन शेतामध्ये नासधूस करत होता. त्यातच आता हरणा सोबतच हिंसक रानडुकरे ही मलकापूर बेलाड शिवारात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आधीच शेतीवर दुबार पेरणीचे संकट असताना त्यातच या मोकाट हिंसक प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे व श्रमिकांचे जीवन भितीदायक बनले असून वन विभागा बाबत प्रचंड जन आक्रोश नागरिकांमध्ये आहे. मोकाट हरणांच्या कळपा मुळे हतबल असणाऱ्या शेतकऱ्यांना वनविभाग कडून कोणताही दिलासा नाही. त्यामुळे वन विभागाने या गोष्टीला गांभीर्याने घेऊन तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.