खामगाव : येथील प्रभाग क्रमांक १३ मधील शिवाजीनगर भागातील सफाई कामगार, गरोदर माता, दिव्यांग बांधव, महिला कामगार, अंगणवाडी सेविका, व आशा वर्कर, यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक शहराध्यक्ष आकाश खरपाडे यांच्या आयोजनातुन कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या कामगारांना त्यांचा सन्मान म्हणून कोरोना सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले.
जेणेकरून त्या व्यक्ती स्वतः सुरक्षित राहून आपले कुटुंब सुरक्षित ठेवतील सदर कोरोना सुरक्षा किट मध्ये सॅनिटायझर, हेंड वॉश, विट्यामीन गोळ्या, औषधी, मास्क होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विकास चव्हाण, दिलीप पाटील, महिला शहराध्यक्ष सौ सुधाताई भिसे, संगीताताई मोरखडे, गोपाल पवार, वैभव पवार, भिकाजी सोनोने, राजू पन्हाळकर, दीपक शिंदे, ओम शेटे, निखिल अतकरे, लक्ष्मण पवार अजय मांडवेकर यांची उपस्थिती होती.