January 4, 2025
जळगांव जामोद जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय संग्रामपूर

कार्यकर्त्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षाचा राजीनामा-प्रसेनजीत पाटिल

राष्ट्रवादीत करणार प्रवेश

संग्रामपुर : १९९२ पासून सक्रिय राजकारणात लोकप्रियता वाढवत जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापाती, कापूस पणन महासंघ चे उपाध्यक्ष सतत वडशिंगी जी.प.चे अपक्ष सर्वात ज्यास्त मताधिक्याने निवडून आले.२००९ ते २०१४ मध्ये बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी विधानसभेची उमेदवारी दिली व अल्पशा मतांनी पराभव पत्करावा लागला. भारिप मधील अडचणी बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या कानावर टाकून त्यांचे आशीर्वाद घेत २०१७ काँग्रेसमध्ये पक्षांतर, विधानसभा २०१९ विधानसभे काँग्रेसने अचानक वेळेवर नाकारलेली उमेदवारी तसेच विधानसभेनंतर काँग्रेस पक्षात होणारी कार्यकर्त्यांची कुचंबना यामुळे आज १९ जून २०२० रोजी कापूस पणन महासंघाचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रसेनजीत पाटिल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे जाहिर केले.

तसेच स्थानिक समाधान पाटिल जिनिंग फैक्टरी येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत सर्व कार्यकर्त्यांच्या सूचना तथा सहकार्यांचे मार्गदर्शन यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला प्रसेनजीत पाटिल यांनी याआधी २००९ व २०१४ विधानसभा निवडणुक भारिप बहुजन महासंघावर लढवत तगडी झुंज दिली अतिशय कमी मतांनी त्यांचा दोन्ही वेळेस पराभव झाला.२०१७ ला काँग्रेस नेते मुकुलजी वासनिक यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. परंतु, २०१९ ला पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली. त्यानंतर सातत्याने त्यांना व कार्यकर्त्यांना अडगडित टाकण्याचा प्रयत्न स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यां मार्फत केल्या गेला. त्यामुळेच पुढील नगरपरिषद, जिल्हापरिषद,स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या हितासाठी व पुढील राजकीय प्रवासासाठी काँग्रेस पक्षाचा राजीनामा प्रसेनजीत पाटिल यांनी दिला असल्याचे सांगितले आहे. स्थानिक कांग्रेस नेत्यांनी पक्षाला कमजोर करणे सुरू केले असून एकाधिकार चालू केला. त्यामुळे हुकूमशाही ला कंटाळून शरद पवार ह्यांचे विचार जन्मजात अंगात रुळलेले असल्याने सर्वधम समभाव ह्याच विचारावर राहत,आघाडीतच राहत आपले व कार्यकर्त्यांचे भविष्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे प्रसन्नजीत पाटील जाहिर केले.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक युवकांनी घेतला प्रवेश

nirbhid swarajya

प्रिंपि देशमुख येथे पार पडला रजिस्टर मॅरेज

nirbhid swarajya

मी पाहिलेले कुटुंबप्रमुख ते मुख्यमंत्री

nirbhid swarajya
error: Content is protected !!