January 6, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शेतकरी

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी – आ.आकाश फुंडकर

तहसिलदार व कृषी अधिका-यांना दिले तात्काळ पंचनामे करुन घेण्याचे आदेश

खामगांव : खामगांव मतदार संघातील गणेशपूर शिवारात व परिसरात भयंकर अतिवृष्टी होऊन मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान झाले, यासोबतच जमीन खरडून गेली. काल झालेला पाऊस हा ढगफूटी प्रमाणेच होता. त्यामुळे गणेशपूर, चिंचपूर,पाळा, नागझरी व परिसरात भयंकर अतिवृष्टी झाली त्यामुळे हे नुकसान झाले. शासनाने तात्काळ पंचनामे करुन सदर शेतकरी व नुकसानग्रस्त़ नागरीकांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी केली आहे. १६ जून रोजी खामगांव तालुक्यातील गणेशपूर,चिंचपूर, पाळा, नागझरी व परिसरात भयंकर अतिवृष्टी झाली त्यामुळे मोठया प्रमाणात पुर येऊन शेतीचे नुकसान झाले. सदरची माहीती कळताच खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी आज या अतिवृष्टीग्रस्त़ भागाची पाहणी केली. एका तासाभरात झालेल्या या भयंकर अतिवृष्टीमुळे ढगफुटी सदृष्य़ परिस्थिती निर्माण होऊन या संपुर्ण परिसरातील शेकडो हेक्ट़र शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती खरडून गेली, ठिबकसिंचन चे पाइपलाईन वाहून गेली, पाण्याच्या मोटर वाहून गेल्या आहेत,

विहीरी खचल्या असन अनेक विहीरींचे नुकसान झालेले आहे. विहीरी खचल्या आहेत. या सर्व भागाची पाहणी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली. यावेळी या सर्व नुकसानाचे पंचनामे करुन घेण्याचे आदेश त्यांनी तहसिलदार व कृषी अधिकारी यांना दिले. तसेच या परिसरातील नागरीकांना त्यांची शेत जमीन खरडून गेल्यामुळे तिची पोत सुधारण्यासाठी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे, त्यांना मदत न मिळाल्यास येत्या हंगामात हे शेतकरी पेरणी करु शकणार नाही व त्यांच्यापुढे मोठे आर्थीक संकट उभे राहील. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा शासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करुन या शेतक-यांना तातडीने आर्थीक मदत करावी अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी यावेळी केली. त्यांच्या या दौ-यात तहसिलदार श्रीमती जगताप, तालुका कृषी अधिकारी गिरी, पंचायत समिती सदस्य़ हरसिंग साबळे, मंडळ अधिकारी देशमुख, तलाटी यांची उपस्थिती होती. तसेच गणेशपूर येथील सरप, उन्हाळे, बंडू सरप हे देखील यावेळी उपस्थित होते.

Related posts

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल

nirbhid swarajya

खामगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा तीव्र निषेध

nirbhid swarajya

खामगांव शहराला झाले तरी क़ाय….

nirbhid swarajya
error: Content is protected !!