January 4, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शेतकरी

खामगाव बाजार समितीच्या प्रशासकात बदल

सहाय्यक निबंधक कृपलानी यांचे काढले पदभार

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे मुख्य प्रशासक असलेले मलकापूर येथील सहाय्यक निबंधक महेश कृपलानी यांच्या विरोधात वाढत असलेल्या तक्रारींची दखल घेत त्यांना बुलडाणा जिल्हा उपनिबंधक आर.एल.राठोड यांनी एका आदेशाने मुख्य प्रशासक पदावरुन पाय उतार केले आहे.त्यांच्या जागी बुलडाण्याचे विशेष लेखापरिक्षक दिपक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दिपक जाधव यांनी खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकाचा पदभार ही स्वीकारला आहे.दरम्यान सहाय्यक निबंधक महेश कृपलानी यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून कृपलानी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचे संकेत जिल्हा उपनिबंधक आर.एल.राठोड यांनी दिला आहे. खामगाव बाजार समितीवर काँग्रेस- भारिप बमसंची सत्ता होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर सभापती संतोष टाले यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्‍यामुळे राजकीय आरोप-प्रत्‍यारोप रंगले होते. सत्ताधाऱ्यांविरुद्ध तक्रारीही झाल्या होत्‍या. त्‍यातच संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला असल्याने दीड वर्षापासून समितीवर प्रशासक नियुक्‍त आहेत.आधी मलकापूर येथील सहाय्यक निबंधक महेश कृपलानी यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड करण्यात आली होती.त्यानंतर बुलडाण्याचे विशेष लेखापरिक्षक दिपक जाधव यांची नियुक्‍ती झाली.जाधव यांच्‍या नियुक्‍तीवर भाजपचे आ. आकाश फुंडकर यांनी आक्षेप घेतल्याने पुन्‍हा महेश कृपलानींची नियुक्‍ती मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती.

कृपलानी ३१ डिसेंबर २०२० च्या अगोदर पासून प्रशासकाचा पदभार सांभाळत होते. दरम्यान हा पदभार सांभाळतांना कृषी उत्त्पन्न बाजार समितीत चालणाऱ्या कारभार संदर्भात त्यांच्या विरोधात अनेक तक्राऱ्या झाल्या.व ह्या तक्राऱ्या वाढत असल्याने त्यांना मुख्य प्रशासक पदावरून ८ जून रोजी बुलडाणा जिल्हा उपनिबंधक आर.एल.राठोड यांनी एका आदेशाने काढला आहे.त्यांच्या जागी आता पुन्‍हा बुलडाण्याचे विशेष लेखापरिक्षक दिपक जाधव मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. मागील आठवड्यात खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्ये भुईमूंगाच्या शेंगाचे भाव व्यापाऱ्यांनी पाडले होते.आपल्या भुईमूंगाच्या शेंगाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक होऊन प्रशासक कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केले होते. तत्कालीन प्रशासक महेश कृपलानी यांच्या विरोधात वाढत असलेल्या तक्रारी आणि खांमगाव कृषी उपन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी केलेले आक्रमक आंदोलन यामुळे कृपलानी यांचा पदभार काढण्याची ही कारवाई करण्यात आली. खांमगाव कृषी उपन्न बाजार समितीचा तत्कालीन प्रशासक असलेले मलकापूर येथील सहाय्यक निबंधक महेश कृपलानी प्रशासकाचा पदभार सांभाळतांना कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये चालणाऱ्या कारभार संदर्भात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारीं झाली असून या तक्रारीं संदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला कळविणार आहे. आणि जे काही कायदेशीर कारवाई करता येईल ते करू अशी प्रतिक्रिया बुलडाणा जिल्हा उपनिबंधक आर.एल.राठोड यांनी दिली.

Related posts

जलंब सरपंचांनी कमिशनरूपी भ्रष्टाचाराच्या पैशातून केलेल्या कामाची चौकशी करावी…

nirbhid swarajya

टिव्ही जर्नालिस्ट असोशिएशनच्या वतीने बुलडाण्यात 8 जानेवारीला रक्तदान शिबिर

nirbhid swarajya

कोविड योद्धे उर्मी गौरव पुरस्काराने सन्मानित

nirbhid swarajya
error: Content is protected !!