January 6, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

लांजुड फाट्यावर दुचाकिचा अपघात ; २ जण जखमी

नांदुरा : येथून खामगाव कडे येत असलेल्या दोन होमगार्ड यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिल्याची घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे. या धडकेत दोन होमगार्ड जखमी झाले असून त्यांना खामगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार होमगार्ड यांची बुलढाणा इथून ऑनलाईन ड्युटी लावण्यात येत असते. त्यानुसार सकाळी १० वाजताच्या सुमारास नांदुरा तालुक्यातील मातोळा येथील आकाश खराटे व खुमगाव बुर्ती येथील विकास मुंडे हे दोघे आपली दुचाकी क्र. एमएच-२८-बीजे -६७३९ याने खामगाव पोलीस स्टेशन मध्ये ड्युटी साठी येत असताना लांजुड फाट्याजवळ चारचाकी वाहन क्र. एमएच- २८-व्ही-०२९१ याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली,

या धडकेत ते गंभीर जखमी झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ सिल्वरसिटी हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. दोघांच्या पायाला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी चारचाकी वाहन ताब्यात घेतले असून चार चाकी वाहनाचा चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. सदर अपघातानंतर होमगार्ड कर्मचाऱ्यांची ड्युटी स्थानिक तालुक्यातच द्यावी अशी मागणी सुद्धा होमगार्ड कर्मचाऱ्यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना दिली आहे.

Related posts

आज प्राप्त 33 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 06 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत. “पद्मश्री” पोस्टाने पाठवा साहेब !

nirbhid swarajya

पत्रकार संघाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!