April 19, 2025
अमरावती आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शिक्षण

खाजगी कोचिंग क्लासेस ५० टक्के क्षमतेवर सुरू करण्याची मागणी

जिल्ह्यातील खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांनी आंदोलनाचा दिला इशारा…

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ५० टक्के क्षमतेवर परवानगी देण्याची मागणी…

खामगांव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट देखील तीन टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निकषानुसार बुलडाणा जिल्हा अनलॉक च्या पहिल्या लेव्हल मध्ये आला असून सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने व इतर सेवा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केला आहे. यामध्ये शॉपिंग मॉल , सिनेमागृहे , थिएटर यांना ५० टक्के क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे, मात्र सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे , खाजगी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय हे सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता ५० टक्के क्षमते सह खाजगी कोचिंग क्लासेसना सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर असोसिएशन बुलडाणा कोचिंग क्लासेस च्या संचालकांनी केली आहे. तर शासनाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Related posts

बुलडाण्यात 1 में पर्यंत १०० टक्के कोरोना लसीकरण करणाऱ्यांना देणार 1 लाखाचा बक्षीस

nirbhid swarajya

अंबिका क्रिडा मंडळ खामगांव चा विद्यार्थी रुद्र निलेश चिंचोळकर याने कुडो स्पर्धमध्ये जिंकले सुवर्णपदक…

nirbhid swarajya

खामगाव गो.से.महाविद्यालयाचा 2 दिवसीय 75 वा अमृत महोत्सव समारंभ थाटात संपन्न

nirbhid swarajya
error: Content is protected !!