November 20, 2025
आरोग्य जिल्हा नांदुरा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

संभाजी ब्रिगेड नांदुरा तर्फे रक्तदान शिबिर

५३ लोकांनी केले रक्तदान

नांदुरा : संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नांदुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात तब्बल ५३ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता कु.मनीषा रमेश पाटील या जिजाऊच्या लेकीन रक्तदान केले. तसेच भाजपा शहर उपाध्यक्ष प्रमोद हिवाळे यांनी या शिबिरात रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. या शिबिरात बऱ्याच समाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घानोकर यांनी ५०० रुपयांची मदत केली. सदर रक्तदानासाठी खामगाव येथील शासकीय रक्तपेढीची चमू उपस्थित होती. तसेच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री योगेश पाटील,जिल्हा सचिव डॉ.शरद पाटील,शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,पुंडलिक काळे, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घानोकार, राष्ट्रीय विष्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,पत्रकार संतोष तायडे,पुरुषोत्तम भातुरकर, उपस्थित होते. या शिबिराला नांदुरा नगरीचे नगराध्यक्षपती अनीलभाई जवरे यांनी भेट दिली. संभाजी बिग्रेड च्या कार्यकर्ते यांच्या उत्साहाने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

Related posts

राज्यात कोरोनाचा चौथा बळी!

nirbhid swarajya

१७ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

nirbhid swarajya

शिवसेना शहरप्रमुख विजय इंगळे यांच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांच्या कृत्याचा व आमदाराच्या वक्तव्याचा जाहीर निषेध…

nirbhid swarajya
error: Content is protected !!