January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शेगांव सामाजिक

मालमत्ता व इतर करांचा घोळ दूर करून द्या

नवीन हद्द वाढीमधील मालमत्ता व इतर करांबाबत नागरिक आक्रमक

आझाद नगर, शांती नगर, बुरजे नगर, हेन्ड पाटील नगर, मुस्लिम सोसायटी, मिल्लत नगर परिसरातील नागरिकांची मागणी

शेगाव : शेगाव नगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागांमधील नागरिकांवर मालमत्ता व इतर करांचे निर्धारण करीत असताना नगरपालिकेकडून दिशाभूल करणाऱ्या माहित्या व वसुली संदर्भात अवैधरित्या कर निर्धारित केल्या जातअसल्याने आझाद नगर, शांती नगर, बुरजे नगर, हेन्ड पाटील नगर, मुस्लिम सोसायटी या भागातील नागरिक संतप्त झाले असून मालमत्ता व इतर करांबाबतचा घोळ दूर होईपर्यंत या परिसरामध्ये कोणीही पालिकेचे नळ कनेक्शन घेणार नाही आणि कुठलीही कर नगरपालिकेकडे भरणार नाही असा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेगाव नगर पालिकेच्या नवीन हद्द वाढीमध्ये आझाद नगर, शांती नगर, सहारा नगर, बुरजे नगर, हेन्ड पाटील नगर, मुस्लिम सोसायटी, मिल्लत नगर आदी भागांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामळे याभागाचें मूल्यांकन करून पालिका प्रशासनाने विविध कर आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. शासनाने दि. १९/ ०७/ २०१७ रोजी शेगाव पालिका हद्दवाढीस राजपत्र (RNI No. MAHBIL /2009/३१७४८ Reg. No. MCS /174) नुसार मंजूर दिलेली आहे. तर या मंजुराती नंतर पालिकेने २०१९ साली काही भागात रस्ते आणि विदुत लाईटची व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सुविधा दिल्या नंतर त्याचे टॅक्स वसूल करणे गरजेचे असतांना पालिकेच्या कर विभागाकडून मागील ५ वर्षाचे मालमत्ता व इतर कर मागितल्या जात आहे.जे नियमानुसार नाही. या शिवाय काही लोकांनी सण २०१८, २०१९ आणि २०२० साली बांधकाम केलेले आहे. त्यामुळे मालमत्ता कर त्यानुसारच भरून घेणे आवश्यक असतांना सरसकट कर भरण्याचे सांगितल्या जात आहे. याबाबत त्याभागातील नागरिकांनी एक बैठक घेऊन मालमत्ता व इतर करांबाबतचा घोळ दूर होईपर्यंत या परिसरामध्ये कोणीही पालिकेचे नळ कनेक्शन घेणार नाही शिवाय कुठतेही कर नगरपालिकेकडे भरणार नाही असा निर्णय घेतल्याने घेण्यात आला आहे.

याबाबत परिसरातील नागरिकांच्या शिस्टमंडळाने भाजपा नेते पांडुरंग बूच यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली. तर आता नगर पालिकेसह यामागचे आमदार डॉ. संजय कुटे यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, पालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर पालिकेने दिलेल्या सुविधांचा टॅक्स आम्ही भरण्यास तयार आहोत यासाठी मालमत्ता व इतर कराचे फेर अवलोकन करून पालिकेकडून प्रत्यक्षात सुविधा पुरविण्यात आल्या नंतरच्या कालावधीचाच टॅक्स वसूल करण्यात यावा. अशी मागणी करून असे न होता पालिका प्रशासनाकडून अवाजवी टॅक्स वसूल करीत असेल तर या भागातील एकही व्यक्ती टॅक्स भरणार नाही. शिवाय पालिकेचे नळ कनेक्शन घेणार नाही आणि न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागू असा इशारा निवेदनावर देण्यात आला आहे. यासंदर्भात या भागातील शिष्टमंडळ आमदार डॉ. संजय कुटे यांची भेट घेणार असल्याचे समजते. शेगाव नगर पालिकेच्या नवीन हद्द वाढीमध्ये शांती नगर, बुरजे नगर, आझाद नगर, मुस्लिम सोसायटी आदी भागांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये आळसना रस्त्यालगतच्या शांती नगरातून आझाद नगर परिसरात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवडीचेनियोजन करीत असल्याने नगर पालिकेकडून झाडासाठी १०० ट्री-गार्ड (संरक्षण कठडे) मिळावे अशी मागणीही नगराध्यक्ष सौ. शकुंतलाताई बूच आणि मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारेकरण्यात आली आहे. नगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागांमधील नागरिकांवर मालमत्ता व इतर करांचे फेर निर्धारण करावे न.प. ने पुरलेल्या सुविधांपासूनचेच विविध कर वसूल करावे, आझाद नगर, शांती नगर, बुरजे नगर, हेन्ड पाटील नगर, मुस्लिम सोसायटी, मिल्लत नगर या भागातनाल्या नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असून तात्काळ नाल्या अथवा सेव्हरेज मंजूर करावा, ओपनस्पेस ताब्यात घेऊन त्याचे सौंदरीकरण करावे, याशिवाय सिमेंट रस्ते तयार करावे अशी मागणी करण्यात आली असून या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या गेल्यास येत्या न.प. निवडणुकीवर वरील भाग बहिष्कार टाकेल असा इशारा देण्यात आला आहे.

Related posts

भंगाराच्या दुकानाला भीषण आग

nirbhid swarajya

शेगाव तालुक्यात रेती माफीयांचा सळसुळाट…पुर्णा नदीपात्रातून होत आहे अवैध रेतीची वाहतूक…

nirbhid swarajya

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता अन्य परीक्षा होणार नाही!

nirbhid swarajya
error: Content is protected !!