November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

चिखली मार्गावरील अपघातात नांदुरा येथील कंत्राटदार ठार

खामगाव: खामगाव तालुक्यातील गणेशपुर जवळ चारचाकी गाडी पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा येथील प्रसिध्द कंत्राटदार सुभाष मोहता हे आज दुपारी १२:३० च्या सुमारास आपल्या श्रेयस नामक मुलासोबत चिखली येथून खामगावकडे येत असताना गणेशपूर नजीक त्यांचे वाहनावरिल नियंत्रण सुटल्याने त्यांच्या कारला अपघात झाला. या भीषण अपघातात सुभाष मोहता जागीच ठार झाले. तर त्यांचा श्रेयस मोहता नामक मुलगा गंभीर जखमी झाला. श्रेयस मोहता यांच्यावर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघात इतका जोरदार होता की यामधे गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

Related posts

वाडी येथे अवैध दारू विक्री जोरात

nirbhid swarajya

बुलडाणा मध्ये कोरोना बाधीत संख्या १५

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 695 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 151 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!