November 20, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मेहकर

रागाच्या भरात मनोरुग्न मुलाकडून वडिलांचा खून

मेहकर : शहरातील समता नगर परिसरात रात्री अंदाजे ९ वाजे दरम्यान मनोरुग्न मुलानेच रागाच्या भरात कुऱ्हाडी ने वार करून वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील समता नगरात रहात असलेले गजानन संपत गवई(वय ५३) हे जिल्ह्यातील अमडापूर येथे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. घरात नवरा, बायको व २१ वर्षीय मुलगा शुभम राहतात. शुभम हा संभाजीनगर येथे इंजिनिअरिंग दुसऱ्या वर्षात आहे. २९ मे च्या रात्री गजानन गवई हे आराम करीत असताना शुभमने रागाच्या भरात कु-हाडीचे वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर पोलिस ठाण्यात जातो म्हणून घरातून बाहेर पडला. शेजारच्या मंडळींनी या घटनेबाबत पोलिसांना कळवले.

पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, पोलीस उपनिरीक्षक विजय घुले, गणेश लोढे ,उमेश घुगे व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व शुभमशी संपर्क केला असता तो पोलीस स्टेशन जवळ घुटमळत होता. त्यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार शुभम हा मानसिक रूग्ण होता.त्याच्यावर उपचार सुरू होते. आई वडिलांनी अभ्यास कर,मोबाईल कमी बघ असे म्हटले की चिडचिड करायचा. रात्री शुभम ला वडील गजानन गवई यांनी अभ्यास कर मोबाइल खेलु नको म्हणून हटकले असता त्याचा राग मनात धरून शुभम ने वडिलांचा खून केला. गजानन गवई यांना शुभम हा मुलगा, पत्नी, व चार मुली असून त्या विवाहित आहेत. मेहकर पोलिसांनी शुभम ला अटक केली असून हत्या करतांना वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे. फिर्यदि आशाबाई गजानन गवई यांच्या तक्रारी वरुन अप.क्र.२७६/२०२१ कलम ३०२ भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मेहकर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक विजय घुले करत आहेत.

Related posts

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार देशमुख यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट !

nirbhid swarajya

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध

nirbhid swarajya

भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खाजगी रेल्वे धावणार

nirbhid swarajya
error: Content is protected !!