October 6, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

खामगाव : येथून जवळ असलेल्या अकोला रोडवरील डवरे पेट्रोल पंपासमोर एका छोटा हत्ती वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री ९: ३० वाजताच्या सुमारास सुनील सारंगधर चेंडाळने वय ४४ वर्ष रा. सुटाळपुरा हे आपल्या दुचाकी क्र. एम एच-२८-एव्ही-१४५४ याने बाळापुर नाक्या कडून खामगांव कडे येत असताना बाळापुर फैला कडून भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या छोटा हत्ती क्र.एमएच-२८-जी-१९८८ या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील चेंडाळने यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय येथे पाठविला आहे. छोटा हत्ती चालक संतोष भारत गायकवाड रा. बाळापुर फैल याला पोलिसांनी अटक केली आहे. वृत्त लिहीपर्यंत पुढील कारवाई सुरू होती. मृतक सुनील चंडाळने हे खामगांव येथील एसटी महामंडळामध्ये वाहक या पदावर कार्यरत होते, तर येथील फरशी भागात असलेल्या रमण स्टोअर्सचे संचालक सुद्धा होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच सुटाळपुरा भागात व त्यांच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

Related posts

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल

nirbhid swarajya

शिक्षण दिनानिमित्त आपल्या गावातील मुख्यालयी राहत असलेल्या शिक्षकांचे पूजन करा-भाजपा आमदार प्रशांत बंब…

nirbhid swarajya

देवेंद्र देशमुख यांनी दिली निराधार भिका मामांना दृष्टी

nirbhid swarajya
error: Content is protected !!