April 18, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

अल्पवयीन पुतणी वर काकाने केलं दुष्कर्म

खामगांव : येथून जवळ असलेल्या पिपंळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दित येणारे ढोरपगाव येथे नात्याला काळीमा फ़ासणारी घटना घडली आहे. मिळालेल्या महितीनुसार आरोपी भाऊराव धुरंधर याने पुतणीला तुझी काकु घरी नाही आहे, तर तु घरात येऊन स्वंयपाक करुन दे म्हणून बोलवले. ती घरी येताच घरातील दरवाजा लावून तिच्या वर बळजबरीने बलात्कार केला. सदर मुलीने दबावामुळे दोन तीन दिवस हि घटना घरी सांगितलि नाही. परंतु घरच्याना घरात नीट वागत नसल्याचे दिसून आले. तिची विचारपुस केली पण तेव्हा सुद्धा तीने काहीच सांगितले नाही.परंतु घरच्यांनी तिला विश्वासात घेत विचारले असता तिने तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला.

तिने सर्व प्रकार सांगितल्या नंतर घरच्यांच्या पाया खालील जमीन सरकली. घरच्यांनी तात्काल पिपंळगाव राजा पोलिस स्टेशन गाठून सदर घटना नोदंविली. त्यावर घटनेचे गांभीर्य पाहत पोलिस अधिकारी सचिन चव्हाण यानी ताबडतोब कायदेशीर कारवाई करत आरोपी काका भाऊराव वंसता धुरंधरला अटक केली. मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारिवरून आरोपी काका विरुद्ध कलम १३२/ २०२१ ३७६.५०६ व इतर सहकलम ४ बाल लैगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पिपंळगाव राजा चे पोलिस अधिकारी सचिन चव्हाण याच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस अधिकारी मनोहर हिवराळे,पोलिस कर्मचारी मंगलसिगं चव्हाण, मपो कर्मचारी शितल पहुरकर हे करत आहेत.

Related posts

जिल्ह्यातील 15 मद्य विक्री परवाने कायमस्वरूपी रद्द

nirbhid swarajya

खाजगी कोविड रुग्णालयातील १३ डॉक्टरानी दिले सामूहिक राजीनामे

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 321 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 54 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!