January 4, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जळगांव जामोद जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय संग्रामपूर

जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा; ३ आरोपी अटक,१ फरार

खामगांव: येथील तलाव रोड वरील सिंधी कॉलोनी भागात लाखोंचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून एका आरोपीस अटक केली आहे. तर संग्रामपुर येथे काल बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० लाखांचा गुटखा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतरकार यांना खामगांव शहरात अवैध गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तलाव रोड वरील सिंधी कॉलोनी भागात शंकर वाधवानी यांच्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला. यामध्ये विमल पान मसाला १५५ पुडे किंमत २९१७२, नजर गुटका २२० पुड़े किंमत २२ हजार रुपये, विमल पान मसाला लहान १०४ पुडे किंमत १२४८० रु., वी-१ तंबाखू चे १०४ पुड़े किंमत ३१२० रु.वी-१ तंबाखूचे मोठे पुढे १५६ किंमत ५१४८ रु, पान बहार ५० पुड़े किंमत ११२५० रु, विमल पान मसाला मोठा ११० पुढे किंमत २१७८० रु, अशाप्रकारे एकूण १ लाख ४ हजार ९५० रुपयांचा सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त केला आहे. तसेच संग्रामपूर येथे सुद्धा तालुक्यातील लाडणापुर येथे धाड टाकून १० लाख ३२ हजार ५७० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी चारचाकी वाहन सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे. यामुळे पोलिसांनी एकूण १५ लाख ३२ हजार ५७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सोनाळा पोलीस स्टेशन रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संग्रामपुर तालुक्यातील लांडणापुर येथील गुटखा विक्री प्रकरणात आरोपी देवीलाल जयस्वाल, नितीन जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी धीरज जयस्वाल हा फरार झाला आहे. पोलिसांनी या आरोपींविरुद्ध याच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधित पान मसाला गुटखा विक्री केल्याबाबत कलम १८८, २६९,२७२,२७३ नुसार कारवाई केली आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्री वरून एकच लक्षात येते की, महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे जिल्ह्यात गुटखा विक्री जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर डॉ.शिंगणे यांच्या कागदोपत्री कारवाईला आता दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे गुटखा विक्रीला अर्थपूर्ण सहाय्य तर नसेल ना ? अशी चर्चा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सुरू आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोना. गजानन आहेर , पोना संजय नागवे यांनी केली आहे.

Related posts

दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या; एक जण जागीच ठार, दोन गंभीर….

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 89 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 13 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

खामगाव योगेश इंगळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर…

nirbhid swarajya
error: Content is protected !!