November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा मनोरंजन महाराष्ट्र मुंबई विदर्भ शेतकरी सौंदर्य

दुर्मिळ सिंगापूर चेरी वृक्ष खामगावात आढळला

“दुर्मिळ होत चाललेल्या पक्षांच्या ज्युसबारला पर्याय ”

खामगाव : येथील लाॅयन्स ज्ञानपीठ शाळे जवळील ले आऊट मध्ये सिंगापूर चेरी वृक्ष संजय मोरे यांचे अंगणात असून संपूर्ण झाड फुलांनी व फळांनी लगडलेले आहे.त्यांचे कडे चौकशी केली असता हे सिंगापूर चेरी वृक्ष असल्याचे समजले. विदर्भात अतिशय तुरळक प्रमाणात आढळणारा हा वृक्ष याच्या प्रत्येक फुलांवर मधमाश्यां तथा पक्षी आढळून आले व त्यांना भरपूर खाद्य प्राप्त झाले आहे. आजच्या घडीला हे वृक्ष विदर्भात दुर्मिळ असून याची लागवड केल्यास मधमाश्या,किटक व पक्षी यांचे करीता एक पर्वणीच आहे. आपल्या विदर्भात अनेक वृक्ष प्रजाती बघावयास मिळतात त्यापैकी काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.यापैकी असंख्य झाडे ही पक्षांची जुसबार म्हणून ओळखली जातात. जसे की काटेसावर, पांगरा, बिट्टी,पळस, जारूळ (तामण), बहावा(अमलतास), कदंब अशी मोठ्या स्वरूपाची काही वृक्ष फुलानी बहरलेकी त्यावर अनेक पक्षी, किटक, मधमाश्या फुलांच्या मधील गोडरस पिण्याकरीता आकर्षित होत असतात. परंतु ही झाडे मानवीवस्तीतून हद्दपार झाली तसेच शेताच्या बांधावर सुध्दा काहीशीच दृष्टीस पाडतात. ज्यामुळे काही पक्षी, किटक ,मधमाश्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि ह्या वृक्षाची लागवड केल्या नंतर ती मोठी होण्यास भरपूर कालावधी लागतो. त्यावर पर्याय म्हणून सिंगापूर चेरी हे झाड खुपच उपयुक्त आहे. सिंगापूर चेरी मूळची अमेरिकेतील (परदेशी) वनस्पती असून अतिशय झपाट्याने वाढते.तीन ते पाच वर्षात पूर्ण वाढ होते.यावर येणारी शुभ्र पांढरी फुले मधमाश्या, फुलपाखरे व किटकांना आपल्या कडे आकर्षित करतात.यांच्या फुलांमधील रस मधुर गोड असून भरपूर प्रमाणात असतो.या झाडाची गोड रसाळ फळे खाण्यासाठी अनेक पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात. म्हणून पाखरे,किटक व मधमाश्यां करिता ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. याची फळे चविष्ट असून गोंदा सारखी चिकट व तुपा सारखी रवेदार असतात. म्हणूनच ती फळे सर्व प्रकारच्या किटक व पक्षांना आवडतात. फळांचा सुगंध व चव थोडीफार मोह फुलां सारखी वाटते. यामध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. या वनस्पतीचे लाकूड तपकिरी रंगाचे तसेच कठीण स्वरूपाचे असल्यामुळे सुतार कामाकरीता उपयुक्त व जळाऊ लाकूड म्हणूनही कामी आहे.या वृक्षाची मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात व सावली सुध्दा डेरेदार असते ज्यामुळे जमिनीची धुप कमी प्रमाणात होते. या वृक्षाची लागवड नदीकाठी,शेताच्या बांधावर तसेच डोंगरावर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होवून जैवविविधतेत भर पडेल आणि फुलपाखरे, मधमाश्या व पक्षी यांचे करीता अधिवास निर्माण होईल.अतिशय फपाट्याने वाढणा-या या वृक्षाची लागवड सर्वदूर करता येईल कारण मोकाट जनावरां पासून यास कोणताही धोका नाही. आपल्या कडच्या जमिनीत व वातावरणात हे वृक्ष तीस ते चाळीस फुट उंच होवून परिसरातील जैवविविधतेत एक आकर्षक भर टाकण्याचे कार्य करते. लागवड काळाची गरज आहे. सिंगापूर चेरी वृक्षाची आपल्या परिसरात लागवड केल्यास मधमाश्यांच्या तथा फुलांचा रस पिणा-या पक्षांच्या संख्येत निश्चितच वाढ होवून त्यांना नैसर्गिक अधिवास प्राप्त होईल माणसाने याचा स्विकार करावा असे पक्षी तथा वृक्ष मित्र संजय गुरव यांनी सांगितले आहे.

Related posts

खामगांव येथे ऑल बॉडी फिटनेसचा उद्या शुभारंभ

nirbhid swarajya

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तयारीला लागा-पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya

शल्यचिकित्सकांच्या होमटाऊन मध्ये काही खासगी डॉक्टरांनी केली सेवा बंद ; कारवाई होणार का ?

nirbhid swarajya
error: Content is protected !!