November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

पोलिसांची जनुना तलाव वरील वाहनांवर कारवाई; २४ गाड्या केल्या जप्त

खामगाव : जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागला असताना सुद्धा काही नागरिक येथून जवळ असलेल्या जनुना तलाव येथे पोहण्यासाठी व फिरण्यासाठी गेले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत यांचे पथक, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड व कर्मचारी, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर व कर्मचारी हे आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचले असता जनुना तलावच्या गेट जवळ त्यांना तिथे २४ गाड्या मिळून आल्या. पोलिसांनी तलाव परिसरात जाऊन पाहणी केली असता त्यांना त्याठिकानी काही लोक तलावात पोहताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना बाहेर निघायला सांगितले असता काही लोक आपले कपडे तलावाच्या काठावर सोडून पळून गेले. या ठिकाणी काही नागरिक हे पोलिसांच्या हाती लागले होते. तात्काळ पोलिसांनी तेथे ट्रक व ४०७ वाहन बोलावली व सर्व वाहनांना त्यामध्ये टाकून कारवाईसाठी शहर पोलीस स्टेशन येथे आणले. सोबतच १८ वाहनधारकांना सुद्धा पोलीस स्टेशनमधे आणून बसवले होते. या कारवाई मधे शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८,२६९, २७०,२७१, ५१ ब नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related posts

आजादी गौरव पदयात्रा निमित्त १० ऑगस्ट ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिल्ह्यात

nirbhid swarajya

भुखंड घोटाळ्यातील आरोपी विरूध्द आणखी दोन गुन्हे दाखल

nirbhid swarajya

खामगांव मधील प्राध्यापकाची १३ लाखाने फसवणूक

nirbhid swarajya
error: Content is protected !!