November 21, 2025
अमरावती खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शिक्षण शेतकरी सामाजिक

जिल्हा परिषद शाळेत शिकून ‘ती’ बनली अधिकारी

खामगांव : प्रत्येक पालकांची अपेक्षा असते की, आपली मुलगी मोठ्या शाळेतून शिकावी अशी असते.यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळेतील मुला-मुलींची संख्या कमी होत आहे. मात्र, खामगांव तालुक्यातील लाखनवाडा येथील एका सामान्य घरातील मुलीने सर्वसामान्यांचा हा समज दुर केला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेत ती जिल्ह्यात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अधिकारी म्हणुन रुजु झाली आहे. राजश्री रमेश चौधरी असे या धैय्यवेडी जिजाऊच्या लेकीचे नाव आहे. राजश्री ही माँ जिजाऊँच्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील लाखनवाडा या गावची आहे. या गावातच जिल्हा परिषद शाळेत तीने आपले शिक्षण पुर्ण केले. पहिल्याच प्रयत्नामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अधिकारी पदाची (R.T.O) ही पोस्ट आपल्या बुलडाणा जिल्ह्यात मिळवली आहे. वडील खामगांव एस टी आगार येथे वाहक या पदावर कार्यरत होते तर आई ही घरी शेतीचे काम करायची, येवढ्या बिकट परिस्थिती मध्ये सुधा तिने आपले यश संपादन केले असून घरामधे एक बहिण पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे. घरामधे तीन लोकांना वर्दी मिळाल्याने गावात चर्चेचा विषय ठरला आहे.राजश्री ने पहिल्या प्रयत्नामध्ये प्राप्त केलेल्या यशामुळे तिचे संपूर्ण परिसरामध्ये कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलांना न्यूनगंड असतो, मात्र ते हुशार असतात. शिक्षण घेत असतांना स्वत:तील कौशल्य ओळखले तर हवे ते साध्य करता येते. ग्रामीण भागातील मुलांकडे चिकाटी उपजतच असते फक्त जिद्द बाळगायला हवी असे राजश्रीने निर्भिड स्वराज्यशी बोलताना सांगितले. निर्भिड स्वराज्य कडून राजश्रीचे अभिनंदन व पुढील वाटचालिस शुभेच्छा..….!

Related posts

अशोक सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग व्यक्तीला सायकल भेट

nirbhid swarajya

देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक

nirbhid swarajya

तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीची उत्सुकता ; सदस्यांना लागले आरक्षण सोडतीचे वेध…!

nirbhid swarajya
error: Content is protected !!