November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

टीव्ही जर्नालिस्ट संघटनेच्या मागणीला यश

बुलडाणा : प्रसारमाध्यम तसेच पत्रकारांना पेट्रोल डीझल देण्याच्या मागणी साठी आज टीव्ही जर्नालिस्ट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. संघटनेच्या मागणीची जिल्हा प्रशासनाने दखल घेत आज निघालेल्या लॉकडाऊनच्या आदेशात पत्रकारांना पेट्रोल डीझल मिळणार असल्याचे नमूद केले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळामध्ये पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता वार्तांकन करत आहेत. कोरोना संदर्भात घेतली जाणारी काळजी व शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात आपल्या वृत्तांकनातून जनजागृती करीत आहेत. वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांना वेळोवेळी बाहेर फिरावे लागते. आपल्या कडून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काढण्यात येणार्‍या आदेशामध्ये पत्रकारांचा नामोल्लेख नसल्याकारणाने फ्रन्टलाइन वर्करला देण्यात येणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळत नाही. जसे आदेश आपल्याकडून काढण्यात आले आहेत त्या काढलेल्या आदेशामध्ये सकाळी ७ ते ११ पर्यंत पेट्रोल पंप सुरू राहतील व ११ वाजे नंतर केवळ फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना पेट्रोल व अन्य सुविधा देण्यात येते. मात्र या काळात पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर सारख्या सुविधा देण्यात येत नाहीत तरी आपल्याकडून काढण्यात येणाऱ्या आदेशामध्ये फ्रन्टलाइन वर्कर यांसारख्या सुविधा देण्याकरता पत्रकारांचा आवर्जून नमूद करावा अशी विनंती बुलडाणा जिल्ह्या टीव्ही जर्नालिस्ट संघटना यांच्या वतीने करण्यात आली होती. याच मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊन संदर्भाच्या नियमावलीत फ्रन्टलाइन वर्कर म्हणून पत्रकारांना सुद्धा पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिजेल सुविधा देण्यात याव्या असे नमूद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बुलडाणा जिल्हा टीव्ही जर्नालिस्ट संघटनेच्या मागणीला यश आले आहे.

Related posts

गोरगरिबांच्या अन्नासाठी भाजपा आमदार फुंडकर यांचा रुद्रावतार

nirbhid swarajya

अखेर अग्रवाल फटाखा केंद्राचा परवाना रद्द

nirbhid swarajya

नकली नोटांचे मोठे रॅकेट पकडण्यात पोलिसांना मोठे यश….

nirbhid swarajya
error: Content is protected !!