January 6, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

विना परवाना शस्त्र व हत्यार बाळगणार्‍या दोघांना अटक

खामगांव: विनापरवाना शस्त्र व हत्यार बाळगणार्‍या दोघांना खामगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ मे रोजी कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान आरोपी नारायण सीताराम पवार वय ६९, शांताराम नारायण पवार वय २६ रा.अंत्रज फाटा यांची घराची झडती घेतली असता घरातून दोन गावठी पिस्तूल किंमत अंदाजे ५० हजार रुपये व ९ जिवंत काडतुस किंमत २७०० रुपये दोन तलवारी किंमत २ हजार रुपये असा एकूण ५४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खामगांव ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नारायण सिताराम पवार व शांताराम नारायण पवार या दोघांविरुद्ध कलम ३/२५, ४/२५ भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे

Related posts

खामगाव मध्ये कोट्यावधीचा भूखंड घोटाळा

nirbhid swarajya

सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या विद्यार्थ्यांचे सुयश…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 197 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 37 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!