November 20, 2025
आरोग्य गुन्हेगारी जिल्हा नांदुरा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे ३ जण ताब्यात

एलसीबीच्या पथकाने १० इंजेक्शनही केले जप्त

बुलडाणा: कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मजबुरीचा ग़ैरफ़ायदा घेऊन काही जण रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत. बुलडाणा एलसीबीच्या पथकाने आज कार्रवाई करीत काळ्याबाजारात विकल्या जाणारे १० रेमडेसीवीर इंजेक्शन नांदुरा येथून जप्त केले आहे. यामधे एलसीबी ने ३ जणांना ताब्यात घेतले आहे. सदरची कार्यवाही आज संध्याकाळी ४ वाज़ेदरम्यान नांदुरा येथे करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा येथील गैबी नगर मध्ये ३ जण रेमडेसीवीर विकत असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून सापळा रचुन रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या विरूद्ध कार्यवाही करण्यात आली. एलसीबी पथकाच्या एपीआय मोरे आणि पथकाने ही यशस्वी कार्रवाई केली आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात हा काळाबाजार उघडकीस आला आहे. यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांचे जिल्ह्यात लक्ष नसून फक्त कागदावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे दिसून येत आहे. ही धड़ाकेबाज कारवाई केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहेत.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 304 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्हात आता २१ कोरोना पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त 27 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 01 पॉझिटिव्

nirbhid swarajya
error: Content is protected !!