January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र शिक्षण

३७ वर्षीय तरुण शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

खामगाव : कोरोना सध्या धोकादायक वळणावर पोहचला असून सर्वच वयोगटातील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कालच स्थानिक गजानन कॉलनीतील ३७ वर्षीय तरुण शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे.याआधी कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांमध्ये बयोवृध्द नागरिकांचे प्रमाण अधिक होते. मात्र मागील काही दिवसात कोरोनाने अगदी तरुण वयोगटातील रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. येथील गजानन कॉलनी भागातील रहिवाशी तथा एसएसडीव्ही ज्ञानपीठवर शारिरीक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मिलिंद श्यामराव इंगळे वय ३७ यांची काही दिवसापूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम खामगावातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी त्यांची ऑक्सीजन लेवल कमी होती. तसेच ते कोरोना पॉझिटिव्ह देखील होते. दरम्यान कुटूंबियांनी त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांच्यावर एक आठवडा उपचार सुरु होते. दरम्यान काल २ मे रोजी उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,२ भाऊ, १ मुलगा,१ मुलगी असा आप्त परिवारआहे. ते शिवाजी नगर पोस्टेमध्ये कार्यरत एलपीसी सिमा खिल्लारे यांचे ते पती होते

Related posts

शेगांवत झाली अति दुर्लभ आणि जटिल अशी शस्त्रक्रिया

nirbhid swarajya

भर उन्हाळ्यात पुर्णा नदित सोडण्यात आले पाणी…

nirbhid swarajya

१५ डिसेंबर ला हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभावर पोलिस पाटलांचा महामोर्चा धडकणार …

nirbhid swarajya
error: Content is protected !!