November 21, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

बलात्कारातील आरोपी कारागृहातून फरार

बुलडाणा : जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी बुलडाण्याच्या ग्रामसेवक प्रशिक्षण प्रबोधनी येथील तात्पुरत्या कारागृहात कोरोनामूळे विलगीकरणासाठी ठेवण्यात आला होता. मात्र सदर आरोपीने आज पहाटे ५:४५ च्या सुमारास शौचालयाचे लोखंडी गज तोडून फरार झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील गृह विभागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी विनोद शामराव वानखेडे रा.मांडोली पो.पान्हेरी ता. बाळापूर जि.अकोला याच्याविरुद्ध जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपीला कारागृह कोठडी मिळाल्याने त्याला बुलडाणा कारागृहात आणले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याच्या ग्रामसेवक प्रशिक्षण प्रबोधनी या सिंहगड इमारत अर्थात तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस विलगीकरणासाठी ठेवण्यात आले होते. मात्र आज पहाटे ५:४५ वाजताच्या सुमारास आरोपी शौचालयात गेला व त्याने लोखंडी गज तोडून पोबारा केला आहे. व्ही. ना. राऊत बुलडाणा कारागृह अधिक्षक कार्यालया तर्फे देण्यात आल्याने फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. शरद सावळे पुढील तपास करीत आहेत. विशेष म्हणजे या आरोपीने ५-६ दिवसांअगोदर कारागृहात फिनाईल प्रशान केले होते व त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Related posts

उध्दवजी ठाकरे यांच्या सत्काराचे काँग्रेसच्या वतीने आयोजन

nirbhid swarajya

वीज बिल वसुलीस गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जमावाकडून मारहाण

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 75 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 11 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!